लॉकडाउन संपेपर्यंत देणार पाणि
ठाणे : कोरोनामुळे सबंध देशभर लाॅकडाऊन करण्यात आले आहे. सामान्यांच्या हितासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. या सर्व पोलिसांना गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या वतीने मिनरल वाॅटरचे (पाणी) वाटप करण्यात आले.उथळसरचे ब्लाॅक अध्यक्ष समीर पेंढारे, ठाणे राष्ट्रवादीचे पदाधिकारी अभिषेक पुसाळकर आणि सुरेश मुरूडकर यांनी पाण्याचे हे बाॅक्स ठाणेनगर, नौपाडा आणि राबोडी पोलीस ठाण्यात जाऊन दिले. लाॅकडाऊन संपेपर्यंत म्हणजेच १४ एप्रिलपर्यंत हे पाणी वाटप असेच सुरूच राहणार आहे.
693 total views, 1 views today