मदत पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळणार निधी


कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी विभागीय आयुक्तांना मिळणार ४५ कोटी  रुपये

मुंबई :   कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे पसरलेल्या आजारावर नियंत्रित करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विभागीय आयुक्तांना ४५ कोटी इतका निधी उपलब्ध करून दिला आहे असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.    आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुढे म्हटले की, कोविड  – १९ विषाणूच्या राज्यातील वाढता फैलाव लक्षात घेता मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे येणारा निधी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर आयुक्त, जिल्हाधिकारी आणि  संबंधित विभागाचे अधिकारी  यांची चर्चा केली.  मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांच्याशी चर्चा करून  तातडीने विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्याचे निर्देश दिले.  त्यानुसार विभागीय आयुक्तांना ४५ कोटी इतका निधी नुकताच वितरित करण्यात आलेला असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती विजय विजय वडेट्टीवार यांनी दिली          विभागवार माहिती देताना विजय वडेट्टीवार यांनी  सांगितले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कोकण विभागासाठी १५  कोटी, पुणे विभागासाठी १०  कोटी, नागपूर विभागासाठी ५  कोटी, अमरावती विभागासाठी ५  कोटी, औरंगाबाद विभागासाठी 5 कोटी,  नाशिक विभागासाठी ५   याप्रमाणे एकूण ४५ कोटींचा निधी वितरीत करण्यात आलेला आहे.या निधीमधून  कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी बाधित झालेल्या व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे, तात्पुरती निवासी व्यवस्था करणे, अन्न, कपडे वैद्यकीय देखभाल, नमुने गोळा करण्यावरील खर्च तपासणी/छाननीसाठी सहाय्य, Contact Tracing शासनाच्या अतिरिक्त चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा खर्च व उपभोग्य वस्तू, अग्निशमन, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वैयक्तीक संरक्षणासाठी प्रतिरोधक साधनांचा खर्च व व्हेंटीलेटर, हवा शुद्धीकरण यंत्र, थर्मल स्कॅनर्स व इतर साधनांसाठी खर्च करण्यासाठी हा निधी देण्यात आले असल्याची माहिती मा. वडेट्टीवार यांनी दिली.         कोरोनाचा प्रादूरर्भाव रोखण्यासाठी आता सर्वांनीच एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे,  कार्पोरेट क्षेत्रातील मान्यवर नेहमीच राज्यातील अनेक संकटाच्या वेळी मदतीसाठी पुढे आले आहेत यावेळीही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रीत करण्यासाठी मंत्रालय आणि शासकीय कार्यालय, बसेस, एसटी बसेस, ओला , उबेर या शासकीय आणि खाजगी परिवहनाचे  निर्जंतुकीकरण करने, टेस्टिंग किट उपलब्ध करून देणे, प्रयोगशाळांची संख्या वाढवणे या अनुषंगाने  कार्पोरेट क्षेत्राने सामाजिक उत्तरदायित्व निधीत  (  CSR  ) व इतर माध्यमातून  मदत करण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.     राज्यात थैमान घातलेल्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही  असे आश्वासन  देत राज्यातील जनतेने काळजी घ्या सतर्क राहा असं आवाहन वडेट्टीवार यांनी यावेळी केलं 

 474 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.