मुंबईतील सीएनजी पंप मालकांना महानगर गॅस कडून मिळणार दिलासा

खासदार राजन विचारे यांनी केले जाचक अटी शिथिल करण्यासाठी प्रयत्न


ठाणे : गेल्या २५ वर्षापासून मुंबईतील सीएनजी पंप चालविणाऱ्या मालकांच्या मालकी हक्काच्या जागेवर महानगर गॅस ने नूतनीकरणासाठी आलेल्या काही ठराविक पंपाची जागा महानगर गॅसला लीज वर घेतली जाईल अशी अट टाकण्यात येत होती. त्यामुळे सीएनजी पंप चालवणाऱ्या मालकांच्या मालकी हक्कावर ती गदा आणण्याचा महानगर गॅसचा प्रयत्न सुरू होता. संपूर्ण प्रकार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या वृत्तपत्रातून निदर्शनास आणल्यानंतर खासदार राजन विचारे केंद्र शासनाच्या पेट्रोलियम एव प्रकृतीक गैस संबंधी स्थायी समितीचे सदस्य असल्याने यांनी तात्काळ दखल घेऊन दिल्लीत गेल इंडिया लिमिटेड या कंपनीचे चेअरमन मनोज जैन यांची भेट घेऊन नूतनीकरण यासाठी आलेल्या जाचक अट रद्द करावी अशी मागणी पत्राद्वारे करून पंपाच्या मालकांना पाठिंबा दिला.
तसेच या भेटीत त्यांनी असेही म्हटले आहे की, ज्या पंप चालकाने आपले भांडवल गुंतवून आज सुरळीतपणे सीएनजी पंप चालवित असून सुद्धा त्यांच्या सीएनजी पंपाची मालकी जागा महानगर गॅस ला लीजवर द्यावी अशी अट घातली आहे, जर ही अट मान्य केली नाही तर सीएनजीचा सप्लाय बंद करू अशी पंप चालकांना नोटीस दिल्याने सर्व पंप चालकांच्या घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मध्ये पंपाचे मालक व महानगर गॅस त्यांच्यात होणाऱ्या निर्णयावर जर पंप बंद झाल्यास दररोज अडीच लाखाहून रिक्षा चालक आपले उदर निर्वाह करीत आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल येईल. त्यामुळे ही नव्याने घालण्यात आलेली अट रद्द करून त्यांचे नूतनीकरण करून द्यावे अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी कंपनीच्या चेअरमन यांच्याकडे केली.
याची दखल फोन महानगर गॅस चे व्यवस्थापकीय संचालक संजीव दत्ताजी यांनी युनायटेड सीएनजी असोशियन व महानगर गॅस मॅनेजमेंट आपल्या समवेत तातडीची मिटींग बोलून घेऊन चर्चेला सुरुवात झाली आहे. यामध्ये ते लवकरच तोडगा काढून या अटी रद्द करण्यात येईल असे कळविण्यात आले.
हा संपूर्ण प्रकार उघडपणे करून दिल्याबद्दल खासदार संजय राऊत यांचे आभार मानले आहेत.

 483 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.