एसटी प्रवासासाठी ज्येष्ठांच्या सवलत स्मार्ट-कार्डला एक महिना मुदतवाढ

परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली माहिती

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या एसटी प्रवासाच्या सवलत स्मार्ट-कार्ड योजनेला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बस स्थानकावरील अनावश्यक गर्दी होऊ नये यासाठी ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या एसटीच्या सवलत स्मार्ट -कार्ड ची मुदत ३१ मार्च ऐवजी एक महिना वाढवून ३० एप्रिल अशी करण्यात आली आहे .त्यामुळे स्मार्टकार्ड घेणाऱ्या ज्येष्ठांनी या ३१ मार्च पर्यंत स्मार्ट कार्ड घेण्यासाठी घाई आणि गर्दी करू नये असे आवाहन परब यांनी केले आहे.
सध्या एसटी महामंडळाच्या २५० आगारामध्ये तसेच महामंडळाने अधिकृतपणे नेमलेल्या खाजगी वितरका मार्फत ज्येष्ठ नागरिकांना आधार क्रमांकाशी संलग्न असलेली स्मार्ट कार्ड देण्यात येत आहेत. परंतु करोना विषाणूच्या संभाव्य संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून १ एप्रिल नंतर उर्वरित ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्याचीची व्यवस्था पूर्ववत करण्यात येईल तोपर्यंत जुन्या पद्धतीनुसारच ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.असेही परब यांनी सांगितले.

 475 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.