अफवा तसेच जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल


 मॅटरेसमुळे कोरोना विषाणूला प्रतिबंध होईल अशी केेली होती जाहीरात


ठाणे : जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूसंदर्भात अफवा पसरवल्याप्रकरणी तसेच जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी येथील नारपोली पोलीस ठाणे येथे  एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
गंभीर आजाराबाबत अफवा पसरवल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेला हा जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा आहे. पोलीस उपायुक्त पोलीस राजकुमार शिंदे आणि त्यांच्या पथकाने बाळसाहेब सर्जेराव डावखर, वैद्यकीय अधिकारी, खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्र, भिवंडी यांच्या तक्रारीवरुन सदर  कारवाई केली आहे.
 
अरिहंत मॅट्रेसेस चे मालकांनी १३ मार्च रोजी एका गुजराथी दैनिक वृत्तपत्रात ‘‘ arihant mattress ANTI-CORONA VIRUS Mattress पे सोएगा इंडिया तो बढेगा इंडिया CORONA RESISTANCE MATTRESS (6ft x 6ft x 5in) Rs 15000/- Visit our Sleep Gallery @ Wooden’ Za Furniture Kasheli ( Furniture Market) Bhiwandi  या मथळयाखाली  जाहिरात दिली होती.
 
 या  मॅटरेसमुळे कोरोना विषाणूला प्रतिबंध होईल असे जनतेच्या मनामध्ये समजूत करून जनतेची दिशाभूल करणारी जाहीरात प्रसिध्द केली. तसेच सदर  मॅट्रेस वुडनझा फर्निचर, कशेळी, भिवंडी व बिल्डींग क्र. सी-१५ गाळा क्र १०१, १०२, पारसनाथ कॉम्पलेक्स, वळपाडा, दापोडा रोड, पोस्ट अंजुर, ता भिवंडी, जि. ठाणे येथे विक्री करीता उपलब्ध आहेत, तसेच त्याव्दारे त्यांनी कोरोना विषाणूला प्रतिबंध होर्इल असा खोटा दावा करुन जनतेमध्ये त्याबाबत अफवा पसरविली.
 
 सदर मालकाविरुद्ध नारपोली पोलीस ठाणे येथे गुरक्र १६६ भादवि कलम ५०५(०२) सह आपत्ती व्यवस्थापन कायद कलम ५२ सह औषधीद्रव्य व तिलस्मी उपचार (आक्षेपार्ह जाहीराती)अधिनियम १९५४ कलम ३,४,५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा पुढील तपास पोउपनि भाट करीत आहेत.

 1,270 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.