हात न धुताच कर्मचाऱ्यांचा बायमेट्रीक प्रणालीचा वापर

शासनाच्या निर्देशाकडे कल्याण डोंबिवली पालिकेचा कानाडोळा

डोंबिवली : नोवेल कोरोना व्हायरसने कल्याण शहरातही बस्तान मांडण्यास सुरूवात केली असताना आणि महापालिकेने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले असले तरी महापालिकेतच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची काळजी घेण्याबाबत हालगर्जीपणा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सर्व देशात बायोमेट्रीक म्हणजेच उपस्थिती प्रणाली बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असतानाही कल्याण – डोंबिवली महापालिकेत मात्र हजेरीसाठी सर्रास बायोमेट्रीक वापरण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर कर्मचारी हात न धुताच बायमेट्रीक प्रणालीचा वापर करताना दिसून आले.
कल्याण येथे कोरोनाचे तीन रूग्ण सापडल्यानंतर त्यांना तत्काळ मुंबई येथील कस्तुरबा दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे कल्याण शहरात भितीचे वातवरण पसरले असून महापालिकेकडून घाबरून जाऊ नका पण काळजी घ्या असे आवाहन करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर सतत हात धुवा, एकमेकांशी बोलताना चार हात दुर रहा असे सांगत असतानाच महापालिकेचे उपस्थिती प्रणाली यंज्ञ सर्रास सुरू आहे. यामुळे अनेक जण या यंत्रावर आपल्या बोटांचे उमटवून हजेरी नोंदवत असतात. मात्र देशभरात या प्रणालीसाठी बंदी घालण्यात आली असताना महापालिकेचे कर्मचारी सर्रास वापर करत आहेत. यामुळे कोणाला संसर्ग झाला असेल तर हाताच्या बोटांद्वारे नोवेल कोरोनाचे विषाणु पसरतील या भितीने ही प्रणाली काही दिवसांपुर्ती बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयाला कल्याण – डोंबिवली पालिकेतील अधिकाऱ्यांनी हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. नोवेल कोरोनाची काळजी घेण्यासाठी कल्याण येथील रूक्मिणीबाई रूग्णालय आणि शास्त्री नगर रूग्णालयात वेगळा कक्ष तयार करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर रूग्ण आढळल्यास चाचणी करून त्यांना तत्काळ मुंबई येथील कस्तुरबा रूग्णालयात हलविण्यात येत आहे. विशेष म्हणजे नागरिक देखील सतर्क असून सर्दी, खोकला झाला तरी देखील डॉक्टरांकडे नागरिकांनी रांगा लावल्या आहेत. तर कल्याण – डोंबिवली महापालिकेचे वैद्याकीय अधिकारी डॉ.राजु लवंगरे यांच्या संपर्क साधून संशयीत रूग्ण आढळल्यास तो रूग्ण कोठे राहतो, कोठून आला, नेमका काय त्रास होतो आणि लक्षणे काय आहेत याची माहिती द्यावी असे असे मेडीकल असोशिएशनचे अध्यक्ष मिना पृथी यांनी सांगितले. डोंबिवली शहराचे ग्रामदैवत मानले जाणाऱ्या अधिष्ठित असलेल्या गणेश मंदीरात भक्तांची संख्या वाढली तर बंद करणार असल्याची माहिती गणेश मंदीर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले यांनी दिली. रिक्षेमधून प्रवास करणे देखील नागरिकांनी कमी केले असल्याचे निदर्शनास येत आहे. सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली शहरातील विविध संस्थांनी कार्यक्रम रद्द केले असून सभागृह ओस पडलेले दिसून येत आहेत. रस्त्यावरच्या खाद्या ठेले देखील ओस पडलेले दिसून येत आहेत.

 416 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.