शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन

डोंबिवली : शिवजयंतीचे औचित्य साधून डोंबिवली पश्चिमेकडील उमेशनगर येथे समाजसेवक हरिश्चंद्र पाटील यांनी शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरविले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील नागरीक आणि विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि गौरवशाली इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन हरिश्चंद्र पाटील, संदेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात मराठी साम्राज्यांचे चलन सुवर्ण होन व त्याविषयी माहिती ठेवण्यात आली आहे. तलवारीचे प्रकार, तलवारीचे अंग, तलवारीच्या मुठीचे प्रकार, तलवारीच्या पोलादाचे प्रकार, पोलादाचा रंग, तलवारीचे पवित्रे आणि तलवार पारख करण्याची आठ अंग या प्रदर्शनातून सांगितली आहेत. या प्रदर्शनात खांडा, कर्नाटकी धोप, मराठा तलवार-धोप, फीरंग (परदेशी पात असलेला धोप), तलवार विविध प्रकार, पट्टा, छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार, मराठा शस्त्र (भाल्याचे प्रकार), कटयार, धोप (वक्रवती), ढाल, विजयनगर कटयार, पट्टीसा, शिवकालीन मोडीलिपीतील पत्रंचे प्रनिरूप दर्शन, वाघनख्या, बिचवा, खंजराली, बिचवा, कोल्हापूर राणी जिजाबाई यांनी सदाशिव चिमणाजीस लिहिलेले पत्र, जानोजी भोसले यांनी रघुनाथ पंत यांना लिहिलेले पत्र आणि पत्राच्या शेवटी हस्ताक्षर जानोजी भोसले यांचे आहे. माधवराव बल्लाळ यांनी रामशास्त्रींना लिहिलेले पत्र येथे पाहायला मिळत आहे.

 703 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.