राजे प्रतिष्ठान नवी मुंबई मनपा निवडणूकीच्या मैदानात

,अनेक उमेदवार प्रतिष्ठानच्या संपर्कात


नवी मुंबई : छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर देशात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.तोच उत्साह नवी नवी मुंबईतही दिसून येत असल्याने मावळ्यांच्या आग्रहाखातर अखेर राजे प्रतिष्ठान मुंबई संघटक चंद्रकांत धडके (मामा) यांच्या नेतृत्वाखाली राजे प्रतिष्ठाने नवी मुंबईच्या निवडणूक मैदानात उतरून रणशिंग फुंकले आहे.सदरील निवडणूका राजे प्रतिष्ठान नवी मुंबई सचिव योगेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली लढवल्या जाणार असून विविध पक्षातील अनेक उमेदवार प्रतिष्ठानच्या संपर्कात असल्याचे योगेश महाजन यांनी सांगितले.लवकरच अश्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती राजे प्रतिष्ठान मुंबई संघटक चंद्रकांत धडके (मामा) यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत घेण्यात येणार असून प्रतिष्ठानच्या वतीने जास्तीत जास्त जागा लढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे असे योगेश महाजन यांनी स्पष्ट केले.

राजकीय क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडत असल्याने कोणता उमेदवार कोणत्या पक्षातून निवडणूक लढवेल अथवा तो कोणत्या पक्षात जाईल याचा मतदारांना प्रश्न पडला आहे.ज्यांना आपण पोटतिडकीने निवडून द्यायचे तेच नंतर स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदल करत असल्याने यंदा त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची असा निर्धार नवी मुंबईकरांनी केला असून यावेळी राजे प्रतिष्ठाने निवडणूक मैदानात उतरण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.अश्याच जनतेच्या अपेक्षांचा आदर करत राजे प्रतिष्ठान नवी मुंबई सचिव यांनी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.जनतेच्या विश्वासावर निवडून आलेले नगरसेवक सध्या स्वतःच्या फायद्यासाठी जनतेचा विश्वासघात करत असल्याचे दिसून येत आहे.या सर्व प्रकाराला बगल देत जनतेच्या विश्वासातला आणि छत्रपतींच्या विचाराचा उमेदवार देण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे महाजन यांनी सांगितले.

नवी मुंबईत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांना मानणारा मोठा वर्ग आहे.तो वर्ग प्रतिष्ठानच्या पाठीशी उभा असल्याने चांगले आणि जनतेच्या हक्काचे उमेदवार देण्यात आम्हाला यश मिळणार आहे असेही महाजन यांनी स्पष्ट केले.जे उमेदवार प्रतिष्ठानच्या संपर्कात आहेत त्यांच्या अगोदर मुलाखती घेतल्या जातील त्यांचे जनतेकडून अभिप्राय मागवण्यात येथील,त्या नंतर त्यांची उमेदवारी घोषित करण्यात येणार आहे.विविध पक्षातील तसेच सामाजिक संघटना मध्ये कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी निवडणुका लढवण्याची ईच्छा व्यक्त केली असून योग्य आणि छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या विचाराच्या उमेदवाराला प्रथम प्राधान्य देण्यात येईल असे योगेश महाजन यांनी स्पष्ट केले आहे.

 778 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.