लोकपूरमचा मोठा विजय

साई परुळेकरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार

मुंबई : लोकपूरम पब्लिक स्कुलने चतुर्भुज नरसी स्कुलचा १४२ धावांनी मोठा पराभव करत मुंबई इंडियन्स ज्युनियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या साखळी लढतीत दुसरा विजय नोंदवला. फलंदाजीत अर्धशतक आणि गोलंदाजीत ६ विकेट्स मिळवणारा साई परुळेकर या विजयाचा शिल्पकार ठरला.
प्रथम फलंदाजी करताना लोकपूरम पब्लिक स्कुलने ४० षटकात २५२ धावा केल्या. आर्य पडाळेने ७२ , यश सॅलियनने ५३ , साई परुळेकरने ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. तर समीर दासने २० आणि श्वेतांग गुप्ताने १५ धावा केल्या. त्यानंतर चतुर्भुज नरसी स्कुलचा डाव २३ व्या षटकात १२९ धावांवर कोसळला. साईने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीला खिंडार पाडताना सहा विकेट्स मिळवल्या. आर्य पडाळे, समीर दास, ईशान गुप्ता आणि तुभ्यंम पाल्रेचाने प्रत्येकी एक विकेट मिळवली. साईला सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

 596 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.