गावठी कट्ट्यासह तरुण गजाआड

साथीदार भाऊ पसार

डोंबिवली : गावठी कट्टा विक्रीसाठी दोन तरुण कल्याण रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती महात्मा फुले पोलिसांना मिळाली।होती या माहितीच्या आधारे सापळा रचत पोलिसानी अफझल खान या तरुणाला बेड्या ठोकल्या तो टिटवाळा नजीक बल्याणी येथे राहणार आहे.हा कट्टा विक्री करण्यासाठी त्याने आणला होता. तर त्याला कट्टा आणून देणारा त्याचा भाऊ फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत .

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एक इसम गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती महात्मा फुले पोलिसांना मिळाली होती .या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला.अफझल खान हा या ठिकाणी संशयास्पद रित्या आढळून आल्याने पोलिसांनी त्याच्यावर झडप घालत त्याला ताब्यात घेतले .त्याची झडती घेत त्याच्याकडील गावठी कट्टा आणि ५ जिवंत काडतुसे जप्त केली आहे.त्याच्या चौकशी दरम्यान त्याला हा कट्टा त्याच्या भावाने दिला असुज कट्टा विक्रीसाठी आणला असल्याचे उघड झाले पोलिसांनी अफझल खान याला अटक केली असून त्याचा भाऊ पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 584 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.