डोंबिवलीत प्रेमभंगातून तरुणीवर जीवघेणा हल्ला कटरने केले तरुणीच्या गालावर वार

डोंबिवली : प्रेमभंग झाल्याने संतापलेल्या तरुणाने धारदार शस्त्राने भररस्त्यात जीवघेणा हल्ला केला. ही घटना २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव येथे घडली. हल्लेखोर तरुणावर पिढीत तरुणीने रविवारी गुन्हा दाखल केल्यावर विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण सत्र न्यायालयात अटक आरोपीला हजर केल्यावर त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
घन:श्याम शेट्टी ( २५ , रा. मोठा गाव -डोंबिवली पश्चिम ) असे हल्लेखोर तरुणाचे नाव आहे.अटक आरोपीची तीन वर्षापूर्वी एका तरुणीशी ओळख झाली.ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र तीन वर्षानंतर तरुणीने त्याचे प्रेम नाकरले. प्रेमात वेडा झालेल्या घन:श्यामने तिला अनेक वेळेला समजावण्याचा प्रयत्न केला.परंतु तरुणीला त्याचे मान्य नव्हते.आता आपले तुझ्यावर प्रेम नाही असे तिने वारंवार त्याला सांगितले.घनश्यामचा तरुणीच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. अखेर घनश्यामने तरुणीला ठार मारण्याचा निर्णय घेतला. २८ फेब्रवारीला दुपारी तरुणीला भररस्त्यात गाठले. त्यावेळीही तरुणीने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला.अचानक घन:श्यामने त्याच्याजवळील कटरने तिच्या गालावर वार केले. त्यानंतर स्वतःच्या गळ्यावर वार केले. या हल्ल्यात तरुणीचा जीव वाचला असला तरी ती जखमी झाल्याने तिच्यावर उपचार करू घरी सोडून देण्यात आले.घन:श्यामलाही रुग्णालयात दाखल केले होते. विष्णूनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे

 547 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.