रविवारी ठाण्यात गृहनिर्माण संस्थांचा मेळावा

आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे व ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशन यांचा संयुक्त उपक्रम

माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थितीत राहणार

ठाणे : ठाण्याचे आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे तसेच ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशन यांच्या सहकार्याने सहकारी गृहनिर्माण संस्थांचा मार्गदर्शन मेळावा रविवार १ मार्च रोजी गडकरी रंगायतन, ठाणे येथे सकाळी १० वाजता आयोजित केला आहे. 

या मेळाव्यात गृहनिर्माण संस्थांचा स्वयंपूर्ण विकास, गृहनिर्माण संस्थांचा बदललेला कायदा त्याचप्रमाणे गृहनिर्माण संस्थांच्या विविध समस्यांच्या विषयी चर्चा होणार असून भाजप सरकारच्या कार्यकाळात स्वयंपूर्ण विकासाविषयी निर्णय घेऊन त्याप्रमाणे कार्यादेश काढलेला आहे, मात्र त्यानंतर त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही. त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर होण्यासाठी व महानगरपालिका स्तरावर याची योग्य ती व्यवस्था करून लवकरात लवकर कार्यवाही सुरू व्हावी यासाठी हा मेळावा आयोजित केला असून यामध्ये माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सहकार आयुक्त अनिल कवडे, ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक संचालक नगर रचना देशमुख हे याविषयी मार्गदर्शन करणार असून यासंबंधीचं प्रेझेन्टेशन वास्तुविशारद मकरंद तोरसकर हे करणार आहेत अशी माहिती ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशन चे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिली. 

या कार्यक्रमासाठी सर्व गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी आणि सभासद यांनी उपस्थित राहून स्वयंपूर्ण विकास कसा करता येईल या विषयी जाणून घेण्यासाठी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी आणि सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले आहे.

 447 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.