श्री समर्थ विरुद्ध अमर हिंद, युवक विरुद्ध विद्यार्थी अजिंक्यपदासाठी लढणार

किशोर-किशोरी गट मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

मुंबई : लायन्स क्लब ऑफ माहीम व मुंबई खो-खो संघटना यांच्या संयुक्त आयोजना खाली तसेच विद्यार्थी क्रीडा केंद्रच्या विशेष सहकार्याने किशोर-किशोरी मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत श्री समर्थ, अमर हिंद मंडळ, युवक क्रिडा मंडळ व  विद्यार्थी क्रीडा केंद्राने आपआपले सामने जिंकत अंतिम फेरी गाठली. गतविजेत्या ओमसाईश्वर संघाला श्री समर्थने किशोरींगटात पराभवाचा धक्का दिला.

उपांत्य फेरीच्या आज झालेल्या किशोरी गटाच्या पहिल्या सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिराने गतविजेत्या ओम साईश्वर सेवा मंडळाचा १५-०४ (०५-०२ व १०-०२) असा ११ गुणांनी पराभव केला. श्री समर्थकडून खेळताना मधुरा मालपने ३:२०, २:४० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात ८ खेळाडू बाद करून अष्टपैलू खेळ केला. प्रणाली मेंढीने नाबाद २:२०, नाबाद ३:१० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात १ खेळाडू बाद केला. तर गार्गी कांबळीने १:२०, १:१० मिनिटे संरक्षण केले. ओम साईश्वर तर्फे रश्मी दळवीने ४:००, १:४० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात २ खेळाडू बाद केले. सुखदा आंब्रेने १:१०,१:३० मिनिटे संरक्षण करत चांगला खेळ केला.

उपांत्य फेरीच्या किशोरी गटाच्या दुसऱ्या सामन्यात अमर हिंद मंडळाने सरस्वती मंदिर हायस्कूलचा १५-१३ (११-०४ व ०४-०९) असा २ गुण १ मिनिटे ४० सेंकद राखून पराभव केला. अमरहिंद कडून खेळताना रुद्र नाटेकरने २:०० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात ६ खेळाडू बाद केले. किंजल भिकुलेने २:२० मिनिटे संरक्षण करत २ खेळाडू बाद केले. इशिका वर्मा ने १:०० मिनिटे संरक्षण करत ३ खेळाडू बाद केले. सरस्वतीतर्फे मनस्वी सकपाळने १:१०, १:४० मिनिटे सुरक्षा करून ३ खेळाडू बाद केले. तर नताशा मेस्ताने आक्रमणात ५ खेळाडू बाद करत चांगला प्रतिकार केला.

उपांत्य फेरीच्या किशोर गटाच्या पहिल्या सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्राने ओम समर्थ व्यायाम मंदिरचा ११-०८ (०२-०२ व ०४-०४ व ०५-०२) असा जादा डावात ३ गुणांनी पराभव केला. विद्यार्थी तर्फे खेळताना हर्ष कामतेकरने ३:२०, १;३०, ४:४० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात २ गडी बाद करत अष्टपैलू खेळ केला. जनार्दन सावंतने नाबाद २:२०, २:१० संरक्षण करत आक्रमणात ४ गडी बाद केले. अथर्व पालवने १:२०, १:३०, १:४० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ३ गडी बाद केले. ओम समर्थतर्फे आशुतोष नागवेकरने २:३०, २:००, १:५० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात २ गडी बाद केले. श्रेयस सौंदळकरने  नाबाद २:१०, २:२०, १:४० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात १ गडी बाद केले. स्वयम साळवीने २:२०, १:२०, २:१० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात १ गडी बाद केला.

उपांत्य फेरीच्या किशोर गटाच्या दुसऱ्या सामन्यात युवक क्रीडा मंडळाने अमर हिंद मंडळाचा ११-०८ (११-०१-०७) असा १ डाव व ३ गुणांनी पराभव केला. युवककडून खेळताना राज सुर्वेने नाबाद ५:५०, नाबाद १:०० मिनिटे संरक्षण करत ४ गडी बाद केले. शुभम गुरवने १:१०, १:२० मिनिटे संरक्षण केले. ओंकार घवाळीने आक्रमणात २ गडी बाद केले. अमर हिंदतर्फे विघ्नेश कोरे ने २:५०, १:०० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात ३ गडी बाद केले. तर पार्थ चव्हाणने आक्रमणात २ गडी बाद केले.

 463 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.