३५२ विद्यार्थी आले शिक्षणाच्या प्रवाहात

ठाणे जिल्ह्यात सापडले ७१४ शाळाबाह्य विद्यार्थी

जिल्हा परिषदेने हाती घेतली शिक्षणापासून दुरावलेल्या विदयार्थ्यांची शोध मोहीम


ठाणे : शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम हाती घेतली. त्यात जिल्ह्यातील ठाणे मनपा, भिवंडी मनपा आणि कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात जानेवारी २०२० पर्यंत सुमारे ७१४ शाळाबाह्य मुले आढळून आली आहेत. त्यापैकी अवघ्या ३५२ विद्यार्थ्यांनीच शाळाप्रवेश घेतला असून ३६२ विद्यार्थी अद्यापही शिक्षणापासून वंचित असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आलेल्या अकडेवारीवरून दिसून येत आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रोजगारासाठी जिल्ह्यातून हंगामी वास्तव्यास कुटूंबच्या कुटूंबे येत असतात. या कुटूबांमध्ये शाळकरी मुलांचा मोठ्या प्रमाणत समावेश असतो. मात्र या स्थलांतरामुळे कुटूंबातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहवे लागते. ही बाब लक्षात घेऊन यंदा शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून त्यांना शाळेत दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे व शिक्षणाधिकारी संगिता भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासह सामाजिक संस्थेच्या मदतीने ७१४ शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात आला. यामध्ये सर्वाधिक ६०९ शाळाबाह्यमुले ही एकट्या भिवंडी मनापाक्षेत्रात अढळून आले आहेत. त्यापाठोपाठ ठाणे मनपाक्षेत्रात ६९ तर, कल्याण -डोंबिवली मनपाक्षेत्रात ३६ मुले आढळून आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यवतीने देण्यात आली. यापैकी अवघ्या ३५२ मुलांचा शाळा प्रवेश करण्यात आला असून ३६२ मुले ही अद्यापही शालाबाह्य असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील सर्व वीटभट्ट्या, दगडखाणी, बांधकामाची ठिकाणे, रेल्वे स्टेशन, झोपडपट्टी, होटेल्स व इतर ठिकाणी शोध घेण्यात आल्यानंतर या ठिकाणी मजूरीसाठी स्थालांतरीत झालेल्या कुटूंबातील मुले असल्याची माहिती प्रभारी बालरक्षक समन्वयक अनिल कुर्‍हाडे यांनी दिली. तसेच शोध घेण्यात आलेल्या मुलांपैकी भिवंडी मनपातील ३५२ विद्यार्थ्यांची शालेय प्रवेशासाठी कार्यवाही सुरू आहे. त्याच प्रमाणे कल्याण डोंबिवली मनपा व ठाणे मनपा यांची ही सदर विद्यार्थ्यांना शोधून शालेय प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू असल्याचे देखिल त्यांनी सांगितले.

 485 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.