पार्थ, युगची शतकी भागीदारी

स्पोर्टिंग क्लब कमिटी स्पोर्टिंग सीसी शताब्दी चषक १४ वर्ष वयोगट क्रिकेट स्पर्धा

ठाणे : पार्थ राणे आणि युग पाटीलने सहाव्या विकेटसाठी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर यजमान स्पोर्टिंग क्लब कमिटीने स्पोर्टिंग सीसी शताब्दी चषक १४ वर्ष वयोगटाच्या कल्याण येथील स्पोर्ट्समन क्रिकेट क्लबविरुद्धच्या लढतीत पहिल्या डावात २५९ धावापर्यंत मजल मारली.
सेंट्रल मैदानावर आजपासून सुरु झालेल्या दोन दिवसीय सामन्याच्या पहिल्या दिवशी यजमानांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्यांना फायदेशीर ठरला नाही. उज्वल माळी आणि विहान भानुशालीने अचूक गोलंदाजी करत यजमानांना ६ बाद १०१ असे अडचणीत आणले. संघ वाईट अवस्थेत असताना पार्थ आणि युगने सातव्या विकेटसाठी ११४ धावांची बहुमूल्य भागीदारी करत संघाला संकटातून बाहेर काढले. पार्थने सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ७२ धावा केल्या तर युगने ४९ चेंडूत आठ चौकार आणि एक षटकार ठोकत ५६ धावा बनवल्या. या डावात उज्वल माळीने ७० धावांत चार आणि विहान माळीने ३५ धावा देत ३ फलंदाज बाद केले.
प्रारंभी स्पोर्टिंग क्लब कमिटीचे अध्यक्ष डॉ राजेश मढवी यांनी स्पर्धेचे रीतसर उद्घाटन केले. त्यावेळी या स्पर्धेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील युवा क्रिकेटपटूना लहान वयात अव्वल दर्जाच्या स्पर्धेत खेळण्याचा अनुभव मिळणार असल्याचे सांगितले. तर ठाणे जिल्ह्यात अशा स्वरूपाची स्पर्धा सुरू व्हावी म्हणून मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव अजिंक्य नाईक आणि सहसचिव दीपक पाटील यांचे मोलाचे सहकार्य मिळाले असल्याचे स्पोर्टिंग क्लब कमिटीचे सचिव दिलीप धुमाळ म्हणाले. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास युवा नेते संदीप पाचंगे, संस्थेचे उपाध्यक्ष किशोर ओवळेकर, सुषमा माधवी, प्रल्हाद नाखवा, पियुष धाक्रस, मुकुंद सातघरे, सुशील म्हापुसकर, सचिन गोरीवले उपस्थित होते.

 1,250 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.