अतुल वालावलकर यांना डॉक्टरेट

आरोग्य सेवा आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्यवसाय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी द थेम इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने डॉक्टरेट देऊन केले सन्मानित

ठाणे : फ्रान्समधील द थेम इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने ठाण्यातील अतुल वालावलकर यांना आरोग्य सेवा आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्यवसाय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी डॉक्टरेट प्रदान केली आहे. दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात अतुल वालावलकर यांना युनिव्हर्सिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले.
देशातील सर्वच वैद्यकीय व्यावसायिकांना दिशा दाखवताना अतुल वालावलकर यांनी बाह्य रुग्ण तपासणी आणि संबंधित रुग्णाला त्याची आर्थिक क्षमता लक्षात घेऊन रुग्णालयातील सेवा देताना ताळमेळ कसा घालवा याचा परिपाठ घालून दिला. त्यांच्या या पॅटर्नची देशभरात चर्चा झाल्यामुळे देशातील अनेक विशेष रुग्णालयांनी अतुल वालावलकरांशी संपर्क साधून त्यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी आपल्या रुग्णालयांत केली होती. या सूचनांमुळे रुग्णालयांच्या कार्यप्रणालीत सकारात्मक बदल घडून आल्याचे त्या त्या रुग्णलयांच्या व्यवस्थापनाने मान्य केले. करोना काळातही अतुल वालावलकर यांनी आपल्या डॉक्टर प्लॅनेट या बाह्य रुग्ण तपासणी केंद्राच्या माध्यमातून कोरोना ग्रस्त रुग्ण आणि करोना न झालेल्या रुग्णांना आवश्यक त्या वैद्यकीय सेवा मिळवून दिल्या होत्या. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन द थेम इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने अतुल वालावलकर यांना डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले. दिल्लीतील कार्यक्रमात द थेम इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे वरिष्ठ पदाधिकारी, देशातील विविध नामांकित डॉक्टर्स सहभागी झाले होते.

 11,831 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.