ठाणे : राज्यातील प्रमुख बॅडमिंटपटूंचा समावेश असलेल्या नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या बॅडमिंटन सुपर लीगला आजपासून सुरुवात होत आहे.
२१ आणि २२ ऑक्टोबर रोजी रंगणाऱ्या स्पर्धेकरता लिलाव पद्धतीने खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यात अमित खडगी, अक्षय कदम, सिद्धेश आरोस्कर, यश तिवारी, अपूर्वा आचरेकर, वेदिका कुलकर्णी यांचा खेळ जवळून बघण्याची संधी नवी मुंबईकराना मिळणार आहे. या बॅडमिंटन सुपर लिगमुळे केवळ नवी मुंबईतच नव्हे तर राज्यात या खेळात नवा पायंडा पडणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
2,576 total views, 2 views today