सेंच्युरी रेयॉन अंतिम फेरीत

सामनाविर ठरलेल्या प्रदीप पांडे आणि रोशन जाधवने प्रत्येकी तीन विकेट्स मिळवत झी इंटरटेनमेंटच्या धावसंख्येवर अंकुश ठेवला.

ठाणे : सेंच्युरी रेयॉन संघाने झी इंटरटेनमेंट सात विकेटसनी पराभव करत ठाणेवैभव आणि स्पोर्टिंग क्लब कमिटी आयोजित ३५ षटकांच्या ४७ व्या आंतरकार्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या क गटात अंतिम फेरीत स्थान मिळवले.
सेंट्रल मैदानात झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत झी इंटरटेनमेंट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. मधल्या फळीतील फलंदाज वगळता इतरांनी सपशेल निराशा केल्याने झी इंटरटेनमेंटला ३३षटकात १४४ धावांवर समाधान मानावे लागले.विशाल दिक्षितने संघासाठी सर्वाधिक ३७ धावांचे योगदान दिले. प्रथमेश कडू (२९), निलंय डागा आणि दर्पण मेहताने प्रत्येकी १२ धावा केल्या. सामनाविर ठरलेल्या प्रदीप पांडे आणि रोशन जाधवने प्रत्येकी तीन विकेट्स मिळवत झी इंटरटेनमेंटच्या धावसंख्येवर अंकुश ठेवला.
उत्तरादाखल सेंच्युरी रेयॉन संघाने ३०.४ षटकात ७ बाद १५१ धावसंख्येसह विजय मिळवला. विनय केणे (४०), प्रशांत तरणे (२६), प्रदीप पांडेने नाबाद २२ धावांची खेळी करत फलंदाजीत आपली उपयुक्तता सिद्ध केली. विशाल दिक्षितने दोन, प्रशांत परिडा आणि अभिषेक येलडीने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
संक्षिप्त धावफलक : झी इंटरटेनमेंट : ३३ षटकात ९ बाद १४४ ( विशाल दिक्षित ३७,प्रथमेश कडू २९, निलंय डागा १२, दर्पण मेहता १२, प्रदिप पांडे ७-२-२३-३, रोशन जाधव ७-१-२०-३) पराभूत विरुद्ध सेंच्युरी रेयॉन : ३०.४ षटकात ७ बाद १५१ ( विनय केणे ४०, प्रशांत तरणे २६, प्रदीप पांडे नाबाद २२, विशाल दिक्षित ४.४ – १८-२, प्रशांत परिडा ३-२१-१, अभिषेक येलडी ५-२३-१).

 78,191 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.