एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या दोन्ही संघांची आगेकूच

उपांत्यपूर्व फेरीत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या अ संघाने युनियन क्रिकेट क्लबचा ५ विकेट्सनी पराभव केला. अन्य लढतीत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या ब संघाने एफटीएल संघाचा ६ विकेट्सनी पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवले.

ठाणे : एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या दोन्ही संघांनी महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित टिपीएल मुख्यमंत्री चषक टी -२० लीग क्रिकेट स्पर्धेतील आपली विजयी घौडदौड कायम राखली आहे. उपांत्यपूर्व फेरीत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या अ संघाने युनियन क्रिकेट क्लबचा ५ विकेट्सनी पराभव केला. अन्य लढतीत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या ब संघाने एफटीएल संघाचा ६ विकेट्सनी पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवले.
पहिल्या लढतीत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब अ संघाने युनियन क्रिकेट क्लबला २० षटकात ९ बाद १०९ धावांवर रोखले. यश चव्हाणने ११ धावांत ३ विकेट्स मिळवत प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजीवर अंकुश ठेवला. त्याखालोखाल प्रसाद पाटीलने १५ धावांत २ विकेट्स मिळवल्या. संघाच्या खात्यात शतकी धावसंख्या नोंदवताना कलश रे ने१८, अमन खानने २४ श्रेयस बोगरने नाबाद १४ धावा बनवल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऋग्वेद मोरेने नाबाद ४८ धावा करत १९ व्या षटकात संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. १८.१ षटकात ५ बाद ११२ धावा करत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब अ संघाने विजय मिळवला. विद्याधर कामतने २०, शशिकांत कदमने नाबाद १३, सिध्दांत अधटरावने १३ धावा केल्या. युनियन क्रिकेट क्लबच्या मोहम्मद करीम, प्रसाद शिंगोटे, श्रेयस बोगर आणि ऋषी नारंगने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
अन्य लढतीत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाच्या सिद्धांत सिंगच्या भेदक माऱ्याचा सामना करत एफटीएल संघाने २० षटकात ८ बाद १५२ धावांचे आव्हान उभे केले. संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देताना आकर्षित गोमेल (३७), अरुण यादव (३१), अर्जुन थापा २२ आणि जयेश पाटीलने २० धावांचे योगदान दिले. सिद्धांतने १३ धावांत ५ विकेट्स मिळवत आपली उपयुक्तता सिद्ध केली. तनुष कोटीयनने २ आणि अंजदीप लाडने एक विकेट मिळवली. त्यानंतर आशय सरदेसाईने नाबाद ५८ धावांची खेळी करत संघाला विजयाचा दरवाजा उघडून दिला. कर्णधार चिन्मय सुतारने (३५), तनुष कोटीयनने(२७) आणि अर्जुन शेट्टीने २२ धावा बनवल्या. पराभुत संघाकडून उझैर खानने २, अनुराग सिंग आणि पराग खानापूरकरने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
संक्षिप्त धावफलक : युनियन क्रिकेट क्लब : २० षटकात ९ बाद १०९ (अमन खान २४, कलश रे १८, श्रेयस बोगर नाबाद १४, यश चव्हाण ३-११-३, प्रसाद पाटील ३-१५-२, निपुण पांचाळ २-१६-१, विद्याधर कामत ४-२१-१) पराभूत विरुद्ध एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (अ) : १८.१ षटकात ५ बाद ११२(ऋग्वेद मोरे नाबाद ४८, विद्याधर कामत २०, शशिकांत कदम नाबाद १३, सिद्धांत अधटराव १३, मोहम्मद करीम ३.१- १३-१, प्रसाद शिंगोटे ३-२९-१, श्रेयस बोगर ३-१६-१, ऋषी नारंग ४-१-४-१).
एफटीएल : २० षटकात ८ बाद १५२ (आकर्षित गोमेल ३७, अरुण यादव ३१, अर्जुन थापा २२, जयेश पाटील २०, सिद्धांत सिंग ३-१३-५, तनुष कोटियन ३-२२-२, अंजदीप लाड २-१५-२) पराभूत विरुद्ध एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब) : आशय सरदेसाई नाबाद ५८, चिन्मय सुतार ३५, तनुष कोटियन २७, अर्जुन शेट्टी २२, उझैर खान ४-४७-२, अनुराग सिंग ४-२९-१, पराग खानापूरकर ३-२०-१).

 103,972 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.