प्रशांत – निलमला अव्वल मानांकन

   ८ वी मंडपेश्वर सिविक फेडरेशन राज्य मानांकन कॅरम स्पर्धा                                                मुंबई : ८ व्या मंडपेश्वर सिविक फेडरेशन राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला शुक्रवार ७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता मंडपेश्वर सिविक फेडरेशन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बोरिवली ( पूर्व ) येथे पुरुष एकेरी गटाने सुरुवात होता आहे. तर महिला एकेरी गटाचे सामने शनिवार, ८ एप्रिल  रोजी दुपारी १२.३० वाजता सुरु होतील. पुरुष एकेरी गटात २६४ तर महिला एकेरी गटात ४२ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला असून स्पर्धेतील विजेत्यांना तब्बल १ लाख १० हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येतील. कॅरमला अधिक लोकप्रियता व प्रसिद्धी मिळावी यासाठी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनलवरून या सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून  हिंदीतून मंदार बर्डे व इंग्रजीतून किशोर वागळे स्पर्धेतील थेट प्रक्षेपण होणाऱ्या सर्व सामन्यांचे समालोचन करणार आहेत. स्पर्धा वातानुकूलित हॉलमध्ये खेळविण्यात येणार असून प्रिसाईज क्लासिक कॅरम व ब्रेक टू फिनिश सोंगट्या स्पर्धेत वापरण्यात येणार आहेत. स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून राष्ट्रीय पंच विजय शेरला यांची नियुक्ती करण्यात आली असून संजय बर्वे सहायक प्रमुख पंच म्हणून काम पाहतील.                                       स्पर्धेतील मानांकने पुढीलप्रमाणे 
पुरुष एकेरी : १) प्रशांत मोरे ( मुंबई ) २) झैद फारुकी ( ठाणे ) ३) महम्मद घुफ्रान ( मुंबई ) ४) संदीप दिवे ( मुंबई उपनगर ) ५) पंकज पवार ( मुंबई ) ६) योगेश धोंगडे ( मुंबई ) ७) सिद्धांत वाडवलकर ( मुंबई ) ८) संदीप देवरुखकर ( मुंबई )
महिला एकेरी : १) निलम घोडके ( मुंबई ) २) आकांक्षा कदम ( रत्नागिरी ) ३) आयेशा साजिद खान ( मुंबई ) ४) काजल कुमारी ( मुंबई ) ५) प्राजक्ता नारायणकर ( मुंबई उपनगर ) ६) मिताली पाठक ( मुंबई ) ७) अंबिका हरिथ ( मुंबई ) ८) समृद्धी घाडीगावकर ( ठाणे )

 124 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.