मुंबई श्री कुणाची ? आज फैसला

मुख्य गटासाठी ६० खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र.
दगडे, गुरव, रांजणकर, पवार आणि गुप्ता जेतेपदाच्या शर्यतीत, महिलांच्या गटात अकरा पीळदार सौंदर्यवती.

मुंबई : शेकडो स्पर्धकांच्या उपस्थितीने स्फूर्तीदायक झालेल््या स्पार्टन मुंबई श्री किताबासाठी निलेश दगडे, रोहन गुरव, उमेश गुप्ता, सुशांत पवार, सुशांत रांजणकर, दिपक तांबिटकर, नितिन शिगवण, नितांत कोळीसारख्या पीळदार-जोरदार खेळाडूंमध्ये अंतिम पोझयुद्ध रंगणार आहे. पुरूष शरीरसौष्ठवपटूंसह होत असलेल्या पुरूषांच्या फिजीक स्पोर्ट्स प्रकारात ७० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे तर महिलांच्या गटात तब्बल ११ पीळदार सौंदर्यवती जेतेपदासाठी झुंजतील. मुंबई श्रीचा फैसला करणारे पोझयुद्ध शनिवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून संकुलात रंगेल.
आज मुंबईकरांनी मुंबई श्रीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुंबईच्या शरीरसौष्ठवाची ताकद पाहिली. बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटना आयोजित प्रतिष्ठेच्या स्पार्टन मुंबई श्रीसाठी विक्रमी गर्दी करण्यार्‍या शरीरसौष्ठवपटूंमध्ये आठही गटात अंतिम फेरी गाठण्यासाठी तगडी टक्कर झाली. अंधेरीच्या शहाजी राजे क्रीडा संकुलात अत्यंत संघर्षमय वातावरणात झालेल्या प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी ६० खेळाडू निवडण्यात आले असले तरी ऐतिहासिक मुंबई श्रीचा किताब पटकावण्यासाठी विविध गटातून पात्र ठरलेले निलेश दगडे, रोहन गुरव, उमेश गुप्ता, सुशांत पवार, सुशांत रांजणकर यांच्यातच खरी लढत रंगणार आहे.
तब्बल दोन दशकांनी शहाजी राजे क्रीडा संकुलात सुरू झालेल्या प्राथमिक चाचणीच्या निमित्ताने मुंबईचे शरीरसौष्ठव वैभव एकत्र पाहिल्याने उपस्थितांचे अक्षरशा डोळ्यांचे पारणे फिटले. या मुंबई श्रीची तयारी आंतरराष्ट्रीय दर्जाचीच होती. स्पार्टन न्यूट्रिशनचे सहकार्य लाभलेल्या मुंबई श्री जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेला खेळाडूंसोबत प्रेक्षकांच्या विक्रमी उपस्थितीने चारचाँद लावल््याची प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तीकर यांनी दिली.
प्रत्येक गटात घमासान
आज झालेल््या प्राथमिक स्पर्धेतून प्रत्येक गटातून प्रत्येकी दहा खेळाडूंची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. प्रत्येक गटात १५ ते २० च्या आसपास खेळाडू असल््यामुळे मुंबईच्या पीळदार ग्लॅमरमधून दहा खेळाडू अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले. ५५ किलो वजनी गटातून नितीन शिगवण किंवा नितेश कोळेकरपैकी एक गटविजेता होऊ शकतो. ६० किलो वजनी गटात अव्वल स्थान पटकावण्यासाठी अजिंक्य पवारला बप्पन दास आणि सुशांत घोलम यांचे आव्हान मोडीत काढावे लागणार आहे. ६५ किलो वजनी गटात अरूण पाटील, आनंद पांडे, विवेक गायकवाड यांनी कंबर कसली आहे तर ७५ किलोच्या गटात रोहन गुरवला महेश शेट्टी, सागर म्हात्रेला मागे टाकून गटविजेतेपद मिळवता येईल.
खरी लढत ७५ वरील गटात
मुंबई श्रीचा खरा हीरा गवसणार आहे तो ७५ आणि ८० किलावरील वजनी गटातून.वरच्या तिन्ही वजनी गटात निलेश दगडे,रोहन गुरव, नितांत कोळी, दीपक तांबिटकर,सुशांत रांजणकर, उमेश रांजणकर आणि सुशांत पवार यांच्यापैकी अव्वल कोण येईल याचा अंदाज आज जजेसनाही बांधता आला नाही. मात्र अनेक वर्षे गटातच बाद होत असलेल्या निलेश दगडेने यावेळी प्रचंड मेहनत घेतल्याचे त्याची तयारी पाहूनच कळत आहे.रोहन गुरव, सुशांत पवार, सुशांत रांजणकरसारखे अनेक खेळाडू दरवर्षी गटातच बाद झाले आहेत. पण यंदा त्यांना जेतेपदाची सुवर्णसंधी लाभली आहे. त्यामुळे मुंबई श्रीचे स्वप्न साकार करण्यासाठी हे सारेच जोरदार खेळाडू पुन्हा सज्ज झालेत. त्यामुळे ऐतिहासिक स्पार्टन मुंबई श्रीचा चषक कोण पटकावतो, हे शनिवारीच कळेल.

 133 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.