डॉ. राजेश मढवी फाऊंडेशनच्या गरीब गरजूंसाठी समर्पित  रुग्णवाहिकेचे मुख्यमंत्र्यांच्या  हस्ते लोकार्पण

गुढीपाडव्याचे औचित्य साधून रुग्णवाहिका लोकापर्णाचा कार्यक्रम

ठाणे : हिंदु नववर्ष तसेच गुढी पाडव्याचे औचित्य साधून २२ मार्च रोजी डॉ. राजेश मढवी फाऊंडेशनतर्फे गोरगरीब गरजूंसाठी समर्पित वाजवी दरात रुग्ण सेवा देण्यासाठी रुग्णवाहिकेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते  लोकार्पण करण्यातआले. आमदार संजय केळकर, अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, माजी महापौर नरेश म्हस्के यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची शोभा वाढविली. सदर कार्यक्रमासाठी  खासदार विनय सहस्त्रबुद्धे, प्रदेश सचिव संदीप लेले, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर सर्वश्री अँड सुभाष काळे,पल्लवी कदम, माजी नगरसेवक संजय वाघुले, राजेश मोरे, भास्कर पाटील,महामंत्री विलास साठे, हेमंत पवार, सचिन जोशी, प्रदेश प्रवक्ता मृणाल पेंडसे, सुनेश जोशी , सुजय पत्की, कोपीनेश्वर सांस्कृतिक मंचाचे संजीव ब्रम्हे, किरण नाक्ती ,ठाणे वकील असोशिएशन अध्यक्ष प्रशांत कदम, नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, केदार जोशी, मकरंद मुळे,ब्रहमकुमारी बिंदीयाबेन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. फाऊंडेशनच्यावतीन डॉ राजेश मढवी व माजी नगरसेविका प्रतिभा मढवी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 63,980 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.