सायकल राईड मध्ये २५० हून अधिक महिलांचा सहभाग

जागतिक महिला दिनानिमित्त ठाणे महापालिका आणि आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशनने संयुक्तरित्या केली होती आयोजित

ठाणे : ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त ‘समानता स्वीकारणे’ या संकल्पनेवर आधारित रणरागिने सायकल राईडचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये २३० हून अधिक महिलांनी सहभागी घेतला होता.
ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त १संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या सायकल राईडचे आयोजन करण्यात आले होते.
पाच आणि दहा किलोमीटर राईडचे आयोजन करण्यात आले होते. यात चार वर्षाच्या लहान मुला मुलींपासून ते अगदी सत्तर वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व महिला आणि त्यांना करण्यासाठी सर्व पुरुष वर्ग देखील सहभागी झाले होते. या सायकल राईड मध्ये पोलिसांना देखील सायकल चालवण्याचा मोह आवरला नाही. ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने यांनीही बच्चे कंपनी सोबत सायकल चालवण्याचा आनंद लुटला. ठाणे महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षक महिलांनी देखील सायकल चालवली. यावेळी फिट रहा, हिट रहा अशा घोषणा देखील दिल्या.
ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्त वर्षा दीक्षित,क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, तृतीयपंथी सुधाताई, आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या संस्थापिका – अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे, सदस्या धनश्री गवळी आदींच्या हस्ते झेंडा दाखवून राईडला सुरुवात करण्यात आली. डोंबिवली स्थित हिरकणी संस्था, समतोल फाउंडेशन,समता विचार प्रसारक संस्थांनी यात सहभाग नोंदविला.
प्रमाणपत्र वितरण सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे ग्रामीणच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दिपाली धाटे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव ईश्वर सूर्यवंशी, ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्त वर्षा दीक्षित, तृतीयपंथी सुधाताई, मिलिटरीच्या माजी कॅप्टन वैशाली रोडे, आम्ही cycle प्रेमी फौंडेशनच्या संस्थापिका – अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे, सदस्या धनश्री गवळी आदी व्यासीठावर उपस्थित होते.
त्यांनतर संस्थेतर्फे सायकलिंग क्षेत्रात योगदान देणाऱ्या डॉ. दिपाली धाटे यांना संस्थांतर्फे सर्व सदस्यांच्या उपस्थितीत रणरागिणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांना मानपत्र आणि सायकल ट्रॉफी देण्यात आली. या राईडमध्ये संस्थेतर्फे महिलांना वेशभूषेत येण्याचा आवाहन करण्यात आले होते उत्तम वेशभूषा साकारणारा विशेष पारितोषिक ठेवण्यात आले होते. पारंपारिक वेशभूषेत आलेल्या ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या परिचारिका सुप्रिया पुरी यांनी वेशभूषा स्पर्धेत बाजी मारली त्यांना संस्थेतर्फे सायकल ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सायकलिंग चा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या ज्येष्ठ महिला मीनाक्षी गायकवाड यांना देखील संस्थेतर्फे विशेष पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले त्यांना सायकल ट्रॉफी आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी डॉक्टर दिपाली धाटे यांनी उपस्थित महिलांना आपल्या ओघवत्या शैलीत मार्गदर्शन केले. महिला दिन साजरा करायला लागू नये अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच महिलांनी सायकलिंग कडे वळावे असे आव्हान देखील त्यांनी केले त्याचे फायदे त्यांनी समजून सांगितले.
दरम्यान जिल्हा विधी प्राधिकरण सेवा च्या वतीने महिलांचे कायद्याविषयी जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाचे निवेदन माधुरी कोळी आणि अजय नाईक यांनी केले. कार्यक्रमाला ठाणे जनता सहकारी बँकेचे मोलाचे सहकार्य लाभले.

 17,855 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.