योगेश व निलम उपांत्य फेरीत

शिव शंकर उत्सव मंडळ आयोजित राज्य स्तरीय कॅरम स्पर्धा

मुंबई : शिव शंकर उत्सव मंडळाच्यावतीने आयोजित व भारतीय आयुर्विमा महामंडळ आणि इंडियन ऑइल प्रायोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या उप उपांत्य फेरीत पुण्याच्या माजी विश्वविजेत्या कॅरमपटू योगेश परदेशीने स्पर्धेतील अग्र मानांकित ठाण्याच्या झैद अहमदवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत २२-१७, ४-२५ व १८-१२ असा चुरशीच्या लढतीत विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. तर महिलांच्या उप उपांत्य फेरीत मुंबईच्या आंतर राष्ट्रीय कॅरमपटू निलम घोडकेने मुंबईच्या मैत्रेयी गोगटेवर २२-६, २५-७ अशी सहज मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पुरुष एकेरी उप उपांत्य फेरीचे इतर निकाल पुढीलप्रमाणे.
पंकज पवार ( मुंबई ) वि वि निसार अहमद शेख ( धुळे ) १८-१६, २५-१७, महम्मद घुफ्रान ( मुंबई ) वि वि गिरीश तांबे ( मुंबई ) २५-१, २४-७, जावेद शेख ( मुंबई उपनगर ) वि वि कुणाल राऊत ( मुंबई ) २४-२५, २२-१४, २५-४
महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे इतर निकाल पुढीलप्रमाणे.
श्रुती सोनावणे ( पालघर ) वि वि आयेशा साजिद खान ( मुंबई ) १९-१३, २०-१६, मिताली पाठक ( मुंबई ) वि वि समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ) २५-७, २१-२५, १९-१५, मधुरा देवळे ( ठाणे ) वि वि अंजली सिरीपुरम ( मुंबई ) २-२५, २४-७, १७-१४

 290 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.