आमदार निरंजन डावखरे यांनी केले होते आयोजन
ठाणे : भारतीय जनता पार्टी व अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने पवित्र व मंगलमय वातावरण आणि मंत्रोपचारात होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान पार पडले. या अनुष्ठानात महादेवाच्या आराधनेबरोबरच ठाणेकरांच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
महाशिवरात्रीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी मैदानात पार पडलेल्या होमात्मक लघुरुद्र अनुष्ठानात ५१ दांपत्यांनी सहभाग घेतला. सकाळपासूनच अत्यंत पवित्र व वातावरणात होमाला सुरुवात झाली. भगवान शिवशंकराची आराधना करण्याबरोबरच ठाणेकरांच्या सुखसमृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. या होमाच्या ठिकाणी शेकडो ठाणेकरांनी शिवशंकराच्या पिंडीचे दर्शन घेऊन अभिषेक घातला.
या होमावेळी आमदार संजय केळकर, मैत्रेय दादाश्रीजी यांच्यासह माजी ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे, नारायण पवार, संजय वाघुले, संदीप लेले, भरत चव्हाण, सुनेश जोशी, माजी नगरसेविका प्रतिभा मढवी, नम्रता कोळी, मृणाल पेंडसे, दीपा गावंड, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सारंग मेढेकर, भाजपाचे पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, उद्योगपती कृतार्थ राजा आदींसह अनेक मान्यवरांनी येऊन दर्शन घेतले. तसेच प्रार्थना केली.
33,106 total views, 1 views today