आयसीएल एज्युकेशन सोसायटीकडून गोलकीपरना प्रशिक्षण

८ ते १२ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी ट्रेन एन फाईट चॅलेंजचे आयोजन


मुंबई : इंडियन कल्चरल लीग (आयसीएल) हे क्रीडा, सांस्कृतिक व शिक्षण यांचा प्रसार करण्यामध्ये अग्रेसर आहेत. यावेळी आयसीएल एज्युकेशन सोसायटीने गोलकीपरच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जर्मनीच्या ओलिव्जर काम अकॅडमीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून आयसीएल एज्युकेशन सोसायटीकडून या आठवड्यात ८ ते १२ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी ट्रेन एन फाईट चॅलेंजचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
आयसीएल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेश झुनझुनवाला म्हणाले की, फुटबॉल डेव्हलपिंग कार्यक्रमासाठी ओलिवर कान अकॅडमीसाठी एकत्र येणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. भारतासाठी पहिल्याच अशा पद्धतीचा उपक्रम आहे. अशा उपक्रमाच्या माध्यमातून मुलांमध्ये फुटबॉलबाबत जागृती निर्माण होईल.आयसीएल एज्युकेशन सोसायटीकडून संपुर्णवेळ क्रीडा व्यवस्थापन संस्था सुरु करणार असून मुंबई विद्यापीठाकडून डिग्री कोर्स देखील देण्यात येईल. ही संस्था ही पुढील सेमिस्टरपासून सुरु होईल.या उपक्रमाच्या माध्यमातून फुटबॉलमधील युवा कौशल्यांना संधी मिळणार असून योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडण्यात मदत होईल.
वोलफार्ड्ट म्हणाले, आयसीएल एज्युकेशन सोसायटी सारख्या संस्थेसोबत काम करणार असल्याने आनंदी आहे. फुटबॉल प्रशिक्षकांसाठी गोलकीपर्स कोचेस कार्यक्रम आणि मुलांसाठी फुटबॉल ट्रेनिंग कार्यक्रम या माध्यमातून भारताला आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये आपला ठसा उमटवता येईल.

 299 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.