माय मदर फाऊंडेशनतर्फे ठाणे महोत्सवाचे आयोजन

१७ आणि १८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या ठाणे महोत्सवाच्या पहिल्या दिवशी व्याख्यानमाला आणि दुसऱ्या दिवशी ठाणे ड्युएट आयडॉल कराओके स्पर्धा रंगणार आहे.

ठाणे : माय मदर फाऊंडेशनतर्फे दोन दिवसीय ठाणे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे पूर्व भागातील अष्टविनायक चौकातील मैदानात १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या ठाणे महोत्सवाच्या पहिल्या दिवशी व्याख्यानमाला आणि दुसऱ्या दिवशी ठाणे ड्युएट आयडॉल कराओके स्पर्धा रंगणार आहे, असे माय मदर फाउंडेशनचे अध्यक्ष किरण दरबारे यांनी सांगितले.
पहिल्या दिवशी होणाऱ्या व्याख्यानमालेत ऍडव्होकेट प्रशांत सावंत जेष्ठ नागरिक आणि कायदे , आयुर्वेदाचार्य डॉ अश्विन सावंत आहारातून आरोग्याकडे आदी विषयावर भाष्य करतील. ठाणे ड्युएट आयडॉल कराओके स्पर्धेत प्रथम येणाऱ्या २५ स्पर्धक जोड्याना प्रवेश देण्यात येईल. स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना रोख बक्षिसं, गौरवचिन्हआणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या प्रवेशिका शुक्रवार १७ फेब्रुवारीपर्यंत कविकारल्या जातील. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी किरण दरबारे (९८२०३९३८५५), अनिल जाधव (८१६९८४१७००), अरुण खरात (९५९४४४२३२१) किंवा नाना सावंत (९९६९२२७२२१) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजक सचिव कोमल दरबारे यांनी केले आहे.

 2,812 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.