संदीप दिवे व निलम घोडकेची आगेकूच

       

शिवाजी पार्क जिमखाना आयोजित १४ वी राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

मुंबई : शिवाजी पार्क जिमखाना आयोजित सारस्वत बँक पुरस्कृत १४ व्या राज्य मानांकन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत मुंबईच्या विश्व् विजेत्या संदीप दिवेने मुंबईच्या विकास धारियाला २५-८, २३-२२ असे पराभूत करून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. तर महिला एकेरीत विश्व् क्रमांक तीन असलेल्या मुंबईच्या निलम घोडकेने उपउपांत्य सामन्यात मुंबईच्या उर्मिला शेंडगेचा २५-६, २०-८ असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
पुरुष एकेरी उपउपांत्यपूर्व फेरीचे इतर निकाल पुढीलप्रमाणे
मनोज कांबळे ( मुंबई ) वि वि महम्मद घुफ्रान ( मुंबई ) ९-२५, २५-८, २५-२४, गिरीश तांबे ( मुंबई ) वि वि योगेश धोंगडे ( मुंबई ) २५-१९, १६-२५, २४-११, योगेश परदेशी ( पुणे ) वि वि सिद्धांत वाडवलकर ( मुंबई ) २१-१५, २५-०, झैद फारुकी ( ठाणे ) वि वि संजय मांडे ( मुंबई ) २५-८, १९-२२, २५-७, अभिजीत त्रिपनकर ( पुणे ) वि वि पंकज पवार ( मुंबई ) १७-१४, ८-२२, २५-१७, संदीप देवरुखकर ( मुंबई ) वि वि प्रकाश गायकवाड ( पुणे ) २३-६, २३-१४, प्रशांत मोरे ( मुंबई ) वि वि रिझवान शेख ( मुंबई उपनगर ) १३-११, २५-०
महिला एकेरी उपउपांत्य फेरीचे इतर निकाल पुढीलप्रमाणे
अंबिका हरिथ ( मुंबई ) वि वि आकांक्षा कदम ( रत्नागिरी ) २५-७, २३-७, काजल कुमारी ( मुंबई ) वि वि ऐशा साजिद खान ( मुंबई ) २०-१७, २५-१६, मैत्रेयी गोगटे ( मुंबई ) वि वि प्रिती खेडेकर ( मुंबई ) २०-७, २५-१०

 365 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.