गेल्या अनेक वर्षापासून प्रवाशांसाठी तिकीट खिडकी सुरू व्हावी ही मागणी होती परंतु महापालिकेची जागा असल्याने ती सुरू करण्यासाठी रेल्वेला अडचणींना सामना करावा लागत होता. खासदार राजन विचारे यांनी महापालिकेला जागा देण्याबाबत केली होती सूचना.
मिरारोड : गेल्या अनेक वर्षापासून मिरा रोड रेल्वे स्थानकात जागे अभावी रेल्वे तिकीट खिडकी पादचारी पुलावर असल्याने ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांगांना मनस्ताप सहन करावा लागत होता तो आता दूर झाला असून खासदार राजन विचारे यांनी आपल्या वचनपूर्ती मध्ये दिलेले सर्व कामे मार्गी लागत असल्याचे सांगितले आहे
गेल्या अनेक वर्षापासून प्रवाशांसाठी तिकीट खिडकी सुरू व्हावी ही मागणी होती परंतु महापालिकेची जागा असल्याने ती सुरू करण्यासाठी रेल्वेला अडचणींना सामना करावा लागत होता खासदार राजन विचारे यांनी ५ डिसेंबर २०२२ रोजी पश्चिम रेल्वेचे मुख्य रेल्वे प्रबंधक सत्यकुमार, मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांच्यासोबत पाहणी दौरा केला होता त्यावेळी या रखडलेल्या तिकीट खिडकेचे काम तात्काळ करून द्या अशा सूचना महापालिकेला करण्याची मागणी केली होती. महानगरपालिकेने त्या जागेत तिकीट खिडकी रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी शौचालय तसेच कार्यालयासाठी जागाही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांना ही तिकीट खिडकीची नवीन सोय उपलब्ध झाल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे
मिरा रोड रेल्वे स्थानकात एटीव्ही एम मशीन बारा असून तीन नव्याने वाढविण्यात येणार आहे नवीन पादचारी पुलाचे काम सुरू होणार आहे तसेच एक नंबर फलाटावर नवीन शौचालय चे काम सुरू असून अशा अनेक सुविधा प्रवाशांना इथे मिळणार आहे
भाईंदर रेल्वे स्थानकात भाईंदर पश्चिमेकडे मुख्य प्रवेशद्वाराचे काम पूर्णत्वास येत आहे त्या ठिकाणीही नवीन तिकीट खिडकी सुरू होणार असून एटीएम मशीन १३ असून अधिक चार ने नवीन वाढविण्यात येणार आहे प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर दोन एक्सलेटर एक लिफ्ट एक शौचालय सुरू होणार आहे
या तिकीट खिडकीच्या लोकार्पणासाठी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रबंधक नीरज वर्मा, सीनियर डीसीएम अशोक मिश्रा, महापालिकेचे कार्यकारी अभियंता तांडेल तसेच उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण जंगम,धनेश पाटील,प्रवक्ते शैलेश पांडे,माजी नगरसेवक प्रवीण पाटील, माजी नगरसेविका स्नेहा पांडे,सुप्रिया घोसाळकर,शहर संघटक तेजस्वी पाटील,शहर प्रमुख जितेंद्र पाठक, सदानंद घोसाळकर,उप शहर प्रमुख अस्तिक म्हात्रे,उत्तर भारतीय राष्ट्रीय संघटक अशोक तिवारी,उपस्थित होते
मिरा रोड रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी १२५ कोटींच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात-खासदार राजन विचारे
रेल्वेच्या एमआरव्हीसी मार्फत MUTP 3A प्रकल्पात खासदार राजन विचारे च्या प्रयत्नाने मिरा रोड व भाईंदर या दोन रेल्वे स्थानकांचा विकास बोरवली रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर करण्याची मान्यता मिळवली असून पहिल्या टप्प्यात मिरा रोड रेल्वे स्थानकासाठी ६५ कोटीची निविदा प्रक्रिया झाली असून लवकरच याचे काम सुरू होणार आहे
56,514 total views, 3 views today