आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून विद्यार्थ्यांना बक्षीसे
ठाणे : वार्षिक परीक्षेचा ताण हलका करण्यासाठी एक्झाम वॉरियर्स'नी चित्रे रेखाटून काही काळ तणावापासून मुक्ती घेतली. वागळे इस्टेट येथील के. बी. पी. महाविद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारी झालेल्या या कार्यक्रमाला भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच विजेत्यांना बक्षीसे दिली. वाढत्या शैक्षणिक स्पर्धेतून विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या मनावर मोठा ताण येतो. साधारणत: डिसेंबरपासून दहावी-बारावीच्या विद्यार्थी सतत तणावात असतात. या विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून २७ जानेवारी रोजी
परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमांतर्गत संवाद साधला जात आहे. तत्पूर्वी ठाण्यातील विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी वागळे इस्टेट येथे काल `एक्झाम वॉरियर्स आर्ट कॉम्पिटीशन’ स्पर्धा घेण्यात आली. त्यात कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील सात शाळांमधील नववी ते बारावी विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी जी-२० – जागतिक विश्वगुरू बनण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल, आझादी का अमृत महोत्सव, सर्जिकल स्ट्राईक, कोरोना लसीकरणामध्ये भारत नंबर १, पंतप्रधानांच्या जनसेवेच्या विविध योजना, स्वच्छ भारत अभियान, आत्मनिर्भर भारत, आंतरराष्ट्रीय योगदिन-मोदीजींनी वेधले जगाचे लक्ष, बेटी बचाव-बेटी पढाव, चुलीतल्या धुराच्या त्रासातून मुक्त महिला-मोदीजींचा संवेदनशील निर्णय आदी विषय विद्यार्थ्यांसाठी निश्चित करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना आमदार निरंजन डावखरे, भाजपाचे शहर उपाध्यक्ष सचिन मोरे यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.
7,054 total views, 1 views today