जेविपीजीच्या विजयात गौरव चमकला

सात चेंडूत १७ धावा आणि एका निर्धाव षटकांसह १५ धावांत ३ विकेट मिळवणारा गौरव भटेना मुंबई चॅम्पियनशिप टी-२०लीग क्रिकेट स्पर्धेत जुहू विलेपार्ले जिमखाना संघाच्या १२३ धावांच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

मुंबई : सात चेंडूत १७ धावा आणि एका निर्धाव षटकांसह १५ धावांत ३ विकेट मिळवणारा गौरव भटेना मुंबई चॅम्पियनशिप टी-२०लीग क्रिकेट स्पर्धेत जुहू विलेपार्ले जिमखाना संघाच्या १२३ धावांच्या विजयाचा शिल्पकार ठरला.कोकण युवा प्रतिष्ठान आयोजित स्पर्धेतील सामन्यात जुहू विलेपार्ले जिमखान्याच्या २०६ धावांचा पाठलाग करणाऱ्या फ़ायझर स्पोर्ट्स क्लबचा डाव ८३ धावांवर आटोपला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या जुहू विलेपार्ले जिमखाना संघाने २० षटकात ७ बाद २०६ धावा उभारल्या. आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यावर मधल्या फळीतल्या विशाल पटेलने ३२ चेंडूत नऊ चौकार आणि एक षटकार ठोकत संघाच्या द्विशतकी धावसंख्येत ६३ धावांचे योगदान दिले. वैभव साजनाने २८, सिद्दीद तिवारीने २६ आणि गौरव भातेनाने १४ धावा केल्या. फ़ायझर संघाकडून रौनक जैन आणि मोहनिश वैद्यने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.
उत्तरादाखल आशिष केणी (२३), सचिन गोखले (१४) आणि जगन रामस्वामीचा (१२) अपवाद वगळता फ़ायझर स्पोर्ट्स क्लबचे इतर फलंदाजांना धावा करता आल्या नाही. गौरवच्या जोडीने शुभम शेवाळे आणि यश पाठकने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.
संक्षिप्त धावफलक – जुहू विलेपार्ले जिमखाना : २० षटकात ७ बाद २०६ (विशाल पटेल ६३, वैभव साजना २८, सिद्दीद तिवारी २६, गौरव भटेना १४, रौनक जैन ४-३७-२, मोहनिश वैद्य ४-४५-२, जगन रामस्वामी ४-३१-१, सचिन गोखले २-३२-१) विजयी विरुद्ध फ़ायझर स्पोर्ट्स क्लब : २० षटकात सर्वबाद ८३ (आशिष केणी २३, सचिन गोखले १४, जगन रामस्वामी १२, गौरव भटेना ४-१-१५-३, शुभम शेवाळे ४-२५-२, यश पाठक १५-४-२, कृष्णचंद गर्ग १-३-१, ताविश शेट्टी ३-१३-१, सम्यक गडहीरे ३-२२-१). जुहूविलेपार्ले जिमखाना १२३ धावानी विजयी. सामनावीर – गौरव भटेना.

 207 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.