सितारा देवी संगीत कट्टयावर रंगणार कथ्थक नृत्य आणि संतूर वादन

  

मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे आणि गणेश कल्चरल अकादमीचा त्रैमासिक उपक्रम.

ठाणे : मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे आणि गणेश कल्चरल अकादमी यांच्यावतीने ऑगस्ट २०२२ पासून दर तीन महिन्यातून एकदा शास्त्रीय संगीतावर आधारित डॉ. सितारा देवी संगीत कट्टा या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. या कार्यक्रमामध्ये नामांकित कलाकार आपली कला सादर करतील त्याचप्रमाणे नवीन कलाकारांना देखील संधी देण्यात येणार आहे.
डॉ. सितारा देवी संगीत कट्याच्या या दुसऱ्या कार्यक्रमात मिताली इनामदार, मेधा दिवेकर आणि त्यांच्या शिष्या कथ्थक नृत्य सादर करणार आहेत. संतूरवर साथ देतील मदन ओक आणि तबल्यावर रोहित देव साथ देतील या कार्यक्रमाला अतुल फडके , कौस्तुभ पाटील , कुलदीपसिंग ठाकूर , प्रसाद पटवर्धन , प्राजक्ता काकतकर आणि प्रिया टिपाले साथसंगत देणार आहेत
शुक्रवार, २० जानेवारी रोजी सांय ६.३० वाजता , मराठी ग्रंथ संग्रहालय वा. अ. रेगे सभागृह, पहिला मजला, मराठी ग्रंथ संग्रहालय , सुभाषचंद्र बोस मार्ग, स्टेशन रोड, ठाणे येथे हा कार्यक्रम संपन्न होईल. मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे च्या सर्व सदस्यांनी तसेच ठाणेकर रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठी ग्रंथ संग्रहालयाचे कार्यवाह, दुर्गेश आकेरकर यांनी केले आहे.

 658,702 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.