विकास रेपाळे, नम्रता भोसले यांच्या अडचणीत वाढ

भाजप पदाधिकारी मारहाण प्रकरणी न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

ठाणे : कशीस पार्क मधील भाजप पदाधिकारी प्रशांत जाधव मारहाण प्रकरणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे व नम्रता भोसले यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.बुधवारी झालेल्या सुनावणीत ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने विकास रेपाळे व नम्रता भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
माजी नगरसेवकाकडून भाजप पदाधिकारी प्रशांत जाधव यांना मारहाण झाल्यानंतर ठाणे जिल्हा भाजपने आक्रमक पवित्रा घेत या विरोधात आंदोलन केले होते. विकास रेपाळे, नम्रता भोसले व विकास रेपाळे यांच्या पत्नी यांनी प्रशांत जाधव यांना गंभीर स्वरूपाची मारहाण केल्याचा आरोप भाजपने केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर विकास रेपाळे यांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनाचा अर्ज केला होता. बुधवारी या अर्जावर झालेल्या सुनावणीत ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने विकास रेपाळे, नम्रता भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. यामुळे माजी नगरसेवक विकास रेपाळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळल्याने विकास रेपाळे यांना ठाणे पोलीस आता तरी अटक करतील का असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. भाजपच्या वतीने ऍडवोकेट मकरंद अभ्यंकर व ऍडवोकेट सुरेश कोलते यांनी न्यायालयात बाजू मांडली.

 3,531 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.