अध्यात्मिक लेखन हा त्यांचा आवडीचा विषय असून आध्यत्मिक लेखनही त्यांचे प्रसिद्ध आहे.
ठाणे : एकता कल्चरल अकादमी तर्फे साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल जेष्ठ लेखिका, कवयित्री संगीता कुलकर्णी यांना “मृणाल गोरे स्मृती” पुरस्कार जाहीर झाला आहे. शनिवार १४ जानेवारी रोजी गिरगांव येथे साहित्य संघ नाट्यगृहात मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
संगीता कुलकर्णी या कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शहर शाखेच्या माजी अध्यक्ष राहिल्या आहेत. ‘संगीतपुष्प’, ‘पारिजात’ हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित असून, त्या स्वरचित कवितांच्या कार्यक्रमाचे सादरीकरण करतात.
नामांकित दिवाळी अंक, विविध मासिकांतून, त्यांच्या कथा, ललित कथा,कविता लेखन प्रसिद्ध होत असते.तसेच नामांकित वृत्तपत्रातून सातत्याने विविध विषयांवरील लेख, पुस्तक परिक्षणे आदी सदरांचे लेखन ही सुरु असते. विशेष म्हणजे अध्यात्मिक लेखन हा त्यांचा आवडीचा विषय असून आध्यत्मिक लेखनही त्यांचे प्रसिद्ध आहे.
2,024 total views, 2 views today