उत्कर्ष ,नंदादीप विद्यालय अजिंक्य

प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सव

मुंबई : उपनगरातील शालेय क्रीडागुणांना वाव मिळावा म्हणून गेले ४३ वर्षे सातत्याने आयोजित केल्या जाणाऱ्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवात कबड्डी खेळात मुलांमध्ये मालाडच्या उत्कर्ष मंदिराने तर मुलींमध्ये गोरेगावच्या नंदादीप विद्यालयाने बाजी मारली.
प्रबोधन गोरेगावच्या क्रीडा
भवनात सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवात शालेय क्रीडापटूंची अक्षरश: जत्रा भरली आहे. कबड्डी प्रकारात आपापल्या संघांना पाठिंबा देण्यासाठी शेकडो विद्यार्थ्यांनी क्रीडाभवन गाठले होते. उत्कर्ष आणि एकविरा यांच्यात झालेला सामना रंगलात नाही. चढाईपटू श्रवण बडदे आणि शुभम कळके यांच्या वेगवान खेळाने उत्कर्षला मध्यंतरालाच ३२- १४ अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतर त्या आघाडी आणखीनच भर पडली आणि उत्कर्षने एकविरा संघाचा ४६-२६ असा सहज पराभव करीत प्रबोधन आंतरशालेय स्पर्धेचे मुलांच्या गटाचे जेतेपद संपादले. मुलींच्या गटात नंदादीप विद्यालयाला प्रचिती खेडेकर आणिअभिलाषा पाष्टे यांच्या भन्नाट खेळाने मध्यंतरालाच विजय निश्चित केला होता.जोगेश्वरीचे श्रमिक विद्यालय अत्यंत दुबळे भासले. ते नंदादीपला लढतच देऊ शकले नाही आणि नंदादीपने ४२-९ असा एकतर्फी विजयासह बाजी मारली. अंतिम फेरीच्या दोन्ही सामन्यांनी प्रेक्षकांची घोर निरशा केली. त्यामुळे अंतिम फेरीचा आनंद साखळी सामन्यांपेक्षा दुय्यम दर्जाचा होता.
त्याअगोदर उत्कर्षने बांद्रयाच्या महात्मा गांधी विद्यामंदिराचा ३६-२४ असा सहज पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती तर कांदिवलीच्या एकविरा विद्यालयाने एसटीएस मिशन इंग्लिश शाळेचा ५१-४३ असा पराभव करीत जेतेपदाच्या लढतीत स्थान मिळविले. होते. या स्पर्धेत मुलांच्या गटात १६ शाळांचा सहभाग होता तर मुलींच्या ८ संघांनी सहभाग नोंदविला.

 162 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.