सहा खेळाडूंसह पंच,अधिकारी, स्पर्धाप्रमुख ठाणे जिल्ह्यातील
कल्याण : महाराष्ट्रात २२ वर्षानंतर पुन्हा चालू झालेल्या मिनी ऑलम्पिक या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील त्वायक्वांडो या खेळामध्ये ६ खेळाडू ३ पंच, २ ऑफिशियल आणि १ स्पर्धा प्रमुख असा ठाणे जिल्ह्यातील १२ जणांचा चमु सहभागी होणार आहे.
महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलम्पिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात येत असून राज्यातील खेळाडू संघटक मार्गदर्शक आणि प्रशिक्षक यांच्यासाठी संजीवनी ठरणार आहे. या स्पर्धेमध्ये ३९ क्रीडा प्रकारचा समावेश असून यामध्ये ७५०० खेळाडू, अधिकारी एकाच वेळेस सहभागी होणार आहेत १२ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमुळे राज्यात क्रीडामय वातावरण तयार होणार आहे. या स्पर्धेसाठी तायक्वांडो असोसिएशन ऑफ ठाणे या अधिकृत संघटनेच्या सहा खेळाडूसह व्यवस्थापक, पंच आणि स्पर्धा प्रमुख असतील. नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारे आदित्य पांडुळे, सुरेश चव्हाण, आरुषी पाटील, फातिमा शेख, मर्दावी शिंदे, रेहल पालीवाल आदी पदक जिंकण्यासाठी प्रयत्न करतील. तर स्वप्निल ओंबासे, आकाश बर्वे, रवींद्र गजरे पंच आणि रोहित जाधव व मंगेश आवटी हे व्यवस्थापक म्हणून काम पाहतील. तायक्वांडो स्पर्धा प्रमुख म्हणून तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे महासचिव संदीप ओंबासे हे काम पाहणार आहेत.
इंडिया तायक्वांडोचे अध्यक्ष व महाराष्ट्र ऑलम्पिकचे महासचिव नामदेव शिरगावकर, कल्याण पूर्वचे आमदार गणपतशेठ गायकवाड, कल्याण पश्चिम आमदार विश्वनाथ भोईर, माजी आमदार नरेंद्र पवार, तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल झोडगे,खजिनदार प्रसाद कुलकर्णी, सीईओ गफार पठाण आदींनी या चमूचे अभिनंदन केले आहे.
9,859 total views, 1 views today