राष्ट्र,धर्मकार्यासाठी कृतिशील होण्याचा हिंदूंचा निर्धार

हिंदूंच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि हिंदूंना न्याय मिळण्यासाठी हिंदू राष्ट् करा – प्रसाद वडके, हिंदू जनजागृती समिती

  ठाणे :  लँड जिहाद, हलाल जिहाद, लव्ह जिहादद्वारे भारताला २०४७ पर्यंत इस्लामी राष्ट्र बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि सर्वांनाच संघटितपणे हे प्रयत्न करून हाणून पाडायचे आहेत. १९७६ मध्ये आणीबाणीच्या काळात  इंदिरा गांधींच्या कार्यकाळात घटनेमध्ये दुरुस्ती करून घटनेमध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द घुसडले गेले. आजपर्यंत संविधानात शंभरहून अधिक वेळा पालट केले. तर आता मग पुन्हा घटना दुरुस्ती करून हिंदू राष्ट्र का बनवले जाऊ शकत नाही ? आपण हिंदू राष्ट्राची मागणी ही संविधानाला धरुन असून हिंदूंच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि न्याय मिळण्यासाठी आम्ही हिंदू राष्ट्राची मागणी करत आहोत. असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे प्रसाद वडके यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ठाणे येथील आई माताजी मंदिर सभागृह येथे पार पाडलेल्या हिंदु राष्ट्र जागृती सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या सभेला सनातन संस्थेच्या धनश्री केळशीकर आणि सिरवी विकास समाज मंडळाचे अध्यक्ष सुरेश वरपा यांचेही अमूल्य मार्गदर्शन लाभले. या सभेला सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक अनुराधा वाडेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. विश्व हिंदु परिषद, वंदे मातरम प्रतिष्ठान, राम सेना, अवेकनिंग इंडिया मुवमेंट, सिरवी विकास समाज मंडळ, सनातन संस्था आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे सदस्य, समाजातील विविध मान्यवर यांच्यासह शेकडोहून अधिक धर्मप्रेमींची या सभेला उपस्थिती होती. या सभेचा प्रारंभ शंखनाद आणि दीपप्रज्वलनाने झाला. उपस्थित मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे देशभरात चालू असलेल्या व्यापक कार्याविषयी हिंदु जनजागृती समितीचे सुनिल कदम यांनी सांगितले. सभेचे सूत्रसंचालन समितीचे हेमंत पुजारे यांनी केले.
सनातन संस्थेच्या धनश्री केळशीकर म्हणाल्या , ‘सनातन हिंदू धर्म हा हिंदू राष्ट्राचा प्राण आहे. अनादी काळापासून सनातन हिंदू धर्मामधील सिद्धांतानुसार भारताची राज्यव्यवस्था कार्यरत होती. आज धर्मनिरपेक्षतेचा गवगवा केला जात आहे. पण धर्मनिरपेक्ष व्यवस्था हिंदूंसाठी असुरक्षित बनली गेली आहे. हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक असून त्याकरता आध्यात्मिक सामर्थ्य व हिंदू संघटनशक्ती या दोन्हींची आवश्यकता आहे. ‘
सिरवी विकास समाज मंडळाचे अध्यक्ष सुरेश वरपा म्हणाले, ‘आपल्या धर्माच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप लढले. त्याचप्रमाणे आज हिंदुनी हिंदु राष्ट्रासाठी योगदान देणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक हिंदूने आपल्या धर्मबांधवांना जागृत करण्याचे ध्येय ठेवलं पाहिजे.’

 10,575 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.