या स्पर्धेत अठ्ठेचाळीस संघांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यात मुंबई विभागातील २४ तर ठाणे, पुणे आणि रायगड विभागातील प्रत्येकी आठ संघाना स्पर्धेत प्रवेश देण्यात येणार आहे.
ठाणे : जवळपास सुमारे सहा लाख रुपयांची रोख बक्षिसे हे कोकण युवा प्रतिष्ठान आयोजित मुंबई चॅम्पियनशिप टी – २० लीग क्रिकेट स्पर्धेचे वैशिष्ट्य असणार आहे. ९ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत अठ्ठेचाळीस संघांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यात मुंबई विभागातील २४ तर ठाणे, पुणे आणि रायगड विभागातील प्रत्येकी आठ संघाना स्पर्धेत प्रवेश देण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला दोन लाख पन्नास हजार,उपविजेत्या संघाला एक लाख पन्नास हजार, तृतीय क्रमांकाच्या संघाला ७५ हजार आणि चौथ्या क्रमांकाच्या संघाला पन्नास हजार रुपयांचा रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. याशिवाय सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाला प्रत्येकी १० हजार रुपयांचे बक्षीस मिळेल. तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूस १५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल. स्पर्धेच्या प्रवेशिका ५ जानेवारीपर्यंत स्विकारल्या जातील. अधिक माहितीसाठी धनंजय चाळके, बी -१० अंकिता सहकारी गृहनिर्माण संस्था, ठाकुर्ली रेल्वेस्टेशन समोर ठाकुर्ली,(मोबाईल क्रमांक ८६९३०८५५५५) यांच्याशी संपर्क साधावा.
67,039 total views, 1 views today