महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा, लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करण्याची मागणी

मागणी मान्य करावी म्हणून हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ठाणे स्टेशनबाहेर केले आंदोलन

 ठाणे : महाराष्ट्रातील वाढत्या धर्मांतर आणि लव्ह जिहाद विषयीच्या घटना पाहता तातडीने राज्यात धर्मांतरबंदी कायदा आणि लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करा या मागण्यासाठी ठाणे (प) रेल्वे स्थानकाबाहेर हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातात प्रबोधनपर फलक धरले होते आणि घोषणाही देण्यात आल्या. तसेच शासनाला देण्यात येणाऱ्या निवेदनावर लोकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या.
राज्यात दिवसेंदिवस ‘लव्ह जिहाद’ची समस्या गंभीर रूप धारण करत आहे. खोटे नाव आणि खोटी ओळख सांगणे, फसवणे, महागडी गिफ्ट देणे, रहाणीमान चांगले दाखवणे आदी अनेक माध्यमांतून हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांतर करण्यात येते, त्यानंतर त्यांच्याशी ‘निकाह’ केला जातो. यामध्ये हिंदु युवतींचे भयंकर शोषण केले जाते. तरी या अत्यंत गंभीर समस्येवर उपाय निघणे गरजेचे आहे. लव्ह जिहादच्या घटना आता नित्याच्याच झाल्या असून आपल्या मुली-बाळींना पळवण्यासाठी हे नराधम हिंदूंच्या घरापर्यंत पोहोचले आहेत. अशा घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा, ही मागणीही यावेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधीनी केली.
संपूर्ण देशभरात धर्मांतरबंदी कायदा आणला जावा, यासाठी हिंदु जनजागृती समिती विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह कार्य करत आहे. धर्मांतर हे आपल्या देशाला विभाजनाच्या दिशेने घेऊन जाईल, हे लक्षात घेतले पाहिजे. धर्मांतराचा प्रयत्न जिथे केला जात आहे, त्या ठिकाणी संविधानिक मार्गाने विरोध करण्यासाठी हिंदूंनी पुढे आले पाहिजे, असे आवाहनही या आंदोलनात करण्यात आले.

 19,784 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.