युवा पिढीला वाचनाची गोडी लावण्यासाठी दिवाळी अंक प्रदर्शनासारखे उपक्रम जरुरीचे

स्वराजच्या दिवाळी अंक प्रदर्शनास उस्फुर्त प्रतिसाद

ठाणे : युवा पिढीला अवांतर वाचनाची गोडी लागण्यासाठी दिवाळी अंक प्रदर्शयासारखे उपक्रम आयोजित करायला पाहिजेत असे प्रतिपादन ठाणे जिल्हा मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांनी केले. स्वराज सामजिक सेवा संस्था आयोजित यंदाच्या दिवाळी अंक प्रदर्शनाच्या उदघाटन समारंभात विद्याधर ठाणेकर बोलत होते.
स्वराज सामाजिक संस्थतर्फे आयोजित यंदाच्या दिवाळी अंकाच्या प्रदर्शनाचे यंदा सोळावे वर्ष आहे. तीन दिवस सर्वांसाठी मोफत प्रवेश असणाऱ्या या प्रदर्शनात महाराष्ट्राच्या विविध भागांतून प्रसिद्ध झालेले निरनिराळ्या विषयावरील सुमारे तीनशेहून अधिक दिवाळी अंक वाचकांना पाहता येणार आहेत. महाराष्ट्राला दिवाळी अंकाची गौरवशाली परंपरा आहे. या अंकाच्या माध्यमातून नानाविध विषयांची माहिती वाचकांना मिळत असते. त्यामुळे ज्ञानाचा हा वारसा सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचा आमचा हा प्रयत्न असल्याचे प्रदर्शनाचे मुख्य आयोजक, स्वराज सामाजिक संस्थेचे संस्थापक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर उपाध्यक्ष मनोहर चव्हाण यांनी सांगितले. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्यकारिणी सदस्या आणि सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या डॉ प्रतीक्षा बोर्डे, नाट्यनिर्माते आणि लेखक संदीप विचारे, महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे निवृत्त महाव्यवस्थापक विजय चव्हाण, जेष्ठ पत्रकार मंगेश विश्वासराव आदी मान्यवर उपस्थित होते.हे प्रदर्शन नागरिकांना अष्टविनायक चौकातील खुल्या कलादालनात रविवार ११डिसेंबर पर्यंत सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत पाहता येणार आहे.

 49,019 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.