राष्ट्रीय मिल मजदूर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर.

राष्ट्रीय मिल मजदूर संघ “अमृत महोत्सवी वर्ष” राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष व स्थानिक महिला गट कबड्डी स्पर्धा-२०२२.

मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या “अमृत महोत्सवी वर्षानिमित्त” ९ ते १२ डिसेंबर या कालावधीत आयोजित व्यावसायिक पुरुष व स्थानिक महिला गट कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर करण्यात आली. मुंबई, ना.म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे होणाऱ्या या स्पर्धेत १२ पुरुष व १२ महिला संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे. या सहभागी संघाची चार गटात विभागणी करण्यात आली असून सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येतील. गिरीश इरनाक, निलेश शिंदे, रिशांक देवाडीगा, विशाल माने, प्रणव राणे हे प्रो-कबड्डी स्टार या स्पर्धेत खेळणार आहेत. महिलात सोनाली शिंगटे, सायली जाधव, पूनम यादव, पौर्णिमा जेधे या स्टार खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, व सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या मार्गदर्शना खाली आयोजन करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उदघाटन शुक्रवार ९डिसेंबर रोजी सायंकाळी ६-०० करण्यात येईल. स्पर्धा सायंकाळच्या सत्रात प्रखर विद्युत झोतात खेळविण्यात येईल.
स्पर्धेत सहभागी संघाची गटवारी सचिव गोंविंदराव मोहिते यांनी एका परिपत्रकाद्वारे प्रसार माध्यमाकरिता जाहीर केली. ती खालील प्रमाणे.
पुरुष व्यावसायिक विभाग अ गट :- १)भारत पेट्रोलियम, २)सेंट्रल बँक, ३)टी.वी. एम. ब गट :- १)बँक ऑफ बडोदा, २)मध्य रेल्वे, ३)हिंदुजा रुग्णालय.  क गट :- १)ठाणे महानगर पालिका, २)रिझर्व्ह बँक, ३) मुंबई महानगर पालिका. ड गट :- १)युनियन बँक, २)सी जी एस टी; ३)न्यू इंडिया एन्शुरन्स.
स्थानिक महिला विभाग  अ गट :- १)शिवशक्ती महिला – मुंबई शहर, २)विश्वशांती मंडळ – मुंबई शहर, ३)कर्नाळा स्पोर्ट्स – रायगड. ब गट :- महात्मा गांधी स्पोर्ट्स- मुंबई उपनगर, २)कुर्लाई स्पोर्ट्स – पालघर, ३)राजश्री शाहू – ठाणे,  क गट :- स्वराज्य स्पोर्ट्स – मुंबई उपनगर, २)शिवशक्ती महिला – धुळे, ३)जिजामाता पोलीस संघ- मुंबई शहर. ड गट:- डॉ.शिरोडकर स्पोर्ट्स- मुंबई शहर, २)होतकरू मंडळ – ठाणे, ३)जिजामाता महिला – मुंबई शहर.

 185 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.