संगीत फेस्टिवल ‘बकार्डी एनएच७ वीकेण्डर’च्या १३व्या पर्वाचे समापन

बकार्डी एनएच७ वीकेण्डरच्या १३व्या पर्वाने ‘#१३मेरा वीकेण्डरच्या उत्साहाला साजरे केले आणि समान आवड असलेल्या, तसेच वाढत्या संगीतप्रेमींसाठी काही अद्भुत टॅलेण्टला एकत्र आणले.

पुणे : बकार्डी आणि नॉडविन गेमिंग यांनी भारतातील सर्वात उत्साही संगीत फेस्टिवल बकार्डी एनएच७ वीकेण्डरच्या १३व्या पर्वाचे यशस्वीरित्या समापन केले आहे. २५ ते २७ नोव्हेंबरपर्यंत पुण्यातील महालक्ष्मी लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या ३-दिवसीय बहु-संगीत शैली फेस्टिवलमध्ये पुण्यातील, तसेच देशभरातील इतर शहरांमधील हजारो चाहते उपस्थित होते.
बकार्डी एनएच७ वीकेण्डरच्या १३व्या पर्वाने ‘#१३मेरा वीकेण्डरच्या उत्साहाला साजरे केले आणि समान आवड असलेल्या, तसेच वाढत्या संगीतप्रेमींसाठी काही अद्भुत टॅलेण्टला एकत्र आणले. यंदा फेस्टिवल ४ स्टेजेसमध्ये आयोजित करण्यात आले – बकार्डी एरिना, १३ मेरा स्टेज, कासा बकार्डी आणि कासा इंडी, ज्यांनी प्रेक्षकांना सामावून घेण्यासोबत अनेक तास अद्वितीय मनोरंजन दिले; ४०हून अधिक इंडी भारतीय व आंतरराष्ट्रीय आर्टिस्ट्सच्या लाइनअपसह यंदा टॅलेण्टच्या वैविध्यपूर्ण समूहाने भरलेला उत्साहवर्धक संगीतमय वीकेण्ड पाहायला मिळाला, ज्यामध्ये भारतातील काही प्रतिभावान हिप-हॉप, मेटल, इडी व पॉप आर्टिट्स आणि जागतिक स्तरावरील अचंबित करणा-या प्रमुख आर्टिस्ट्सचा समावेश होता.
मेटल चाहत्यांना ब्लडीवूड, क्रॅकेन, कटस्लिट, पॅकिफिस्ट व डाऊन ट्राडन्स यांसारख्या आर्टिस्ट्सची उच्चवर्धक सादरीकरणे पाहायला मिळाली. समकालीन मनोरंजनाची आवड असलेल्या लोकांनी द एफ१६एस, यशराज, संजीता भट्टाचार्य, अनुव जैन, पारेख अॅण्ड सिंग, मामे खान, तेजस व कामाक्षी खन्ना यांच्या सादरीकरणांचा आनंद लुटला. आंतरराष्ट्रीय स्टार जे.आय.डी. सारख्या हिप हॉप सादरीकरणाने आणि हनुमानकाइंड, वाइल्ड वाइल्ड विमेन, मेबा ऑफिलिया, कृस्ना, एमसी अल्ताफ व पीएव्ही४एन यांसारख्या स्वदेशी आर्टिस्ट्सनी प्रेक्षकांचे छान मनोरंजन केले. फेस्टिवलमध्ये अमेरिकन फोक रॉक बॅण्ड द ल्यूमिनीअर्स, डर्टी लूप्स, स्वीडिश जॅझ, आरअॅण्डबी व पॉप बॅण्ड आणि इस्रायली बॅण्ड टिनी फिंगर्स यांचे मनाला स्पर्श करणारे परफॉर्मन्स पाहायला मिळाले. या सर्वांनी विविध संगीत अभिव्यक्तींना सादर केले.
नॉडविन गेमिंगचे सह-संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक अक्षत राठी म्हणाले, “यंदाच्या एनएच७ वीकेण्डरसाठी थीम #१३मेरा वीकेण्डर होती आणि आम्हाला इंडी संगीताच्या चाहत्यांना एकाच छताखाली एकत्र आणण्याचा आनंद झाला. यंदा प्रेक्षकांना अनेक नवनवीन मनोरंजन पाहायला मिळण्यासोबत अमेरिकन फोक रॉक बॅण्ड द ल्यूमिनीअर्स, अमेरिकन रॅपर जे.आय.डी., स्वीडिश बॅण्ड डर्टी लूप्‍स अशा अनेकांचे उत्सावर्धक परफॉर्मन्स पाहायला मिळाले. फेस्टिवल अत्यंत यशस्वी ठरले, जेथे आम्ही चाहत्यांना सिग्नेचर वीकेण्डर अनुभवासाठी यंदाच्या परफॉर्मर्सच्या लाइन-अपच्या माध्यमातून अनेक शैलींमधील मनोरंजन दिले.’’

 76,648 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.