ठाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिव्यांगांचा जाहीर मेळावा संपन्न

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित केलेल्या या मेळाव्यात ठाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धान्य वाटप व २ बॅटरी सायकल चे वाटप करण्यात आले.

ठाणे : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पहिल्यांदा ठाण्यामध्ये दिव्यांग क्रांती विभाग ठाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने अनुराधा मंगल कार्यालय, नरी बाबा दर्गा रोड, चंदनवाडी येथे दिव्यांगांचा जाहीर मेळावा संपन्न झाला. त्यावेळी खासदार राजन विचारे, लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, जिल्हाप्रमुख केदार दिघे, संपर्क प्रमुख ओवळा माजिवडा नरेश मणेरा, उपजिल्हाप्रमुख, प्रवक्ते संजय घाडीगावकर, उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहरप्रमुख वसंत गवाळे, महिला जिल्हा संघटक समिधा मोहिते, रेखा खोपकर, महिला उप जिल्हा संघटक महेश्वरी संजय तरे व इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यासाठी ठाणे शहरातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दिव्यांगाना ठाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने धान्य वाटप व दोन बॅटरी सायकल चे वाटप केले. या मेळाव्यासाठी प्रमुख सल्लागार म्हणून दिव्यांग क्रांती विभाग या खासदार राजन विचारे यांची निवड केली आहे तसेच या मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट की ठाणे शहरात असे असंख्य दिव्यांग व्यक्ती आहेत की त्यांना सरकारी योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचण्यासाठी ही संस्था काम करणार आहे. तसेच दिव्यांगांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडे पाठपुरावाही करणार आहे नुकताच प्रहार दिव्यांग क्रांती संस्था यांच्या असलेली सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात जाहीर प्रवेश केला.

 29,822 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.