सेंट जॉन शाळेच्या दारावरच खुली मुतारी


पालक-बालक झाले बेजार , शाळेबाहेर गार्डनिंग करण्याची जितेंद्र जैन यांची मागणी

ठाणे ः ठाण्यातील मासुंदा तलावासमोर असलेल्या सेंट जॉन शाळेच्या बाहेरील आवारात भटके, गर्दूल्ल्यांनी कब्जा करत मुतारीने हा परिसर गलिच्छ केल्याने शाळेत पालकांना घेण्यास येणार्‍या विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. सामाजिक कार्यकर्ते व रिद्धीसिडी मेडिकलचे जितेंद्र जैन यांनी नगरसेविका प्रतिभा मढवी यांच्या ही बाब निदर्शनास आणूस या परिसराची त्वरीत स्वच्छता करून घेतली. मात्र हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी भिंतीलगत झाडे लावून गार्डनिंग करण्याची मागणी ठामपा आयुक्त, जिल्हाधिकारी प्रशासनाकडे केली आहे.
स्मार्ट सिटीच्या यादीत असलेले ठाणे स्वच्छ, सुंदर राखण्यासाठी अनेक ठिकाणी भिंतींना रंगरंगोटी केली जात आहे. ठाण्याच्या विकासात प्रेरणादायी असलेली आकर्षक चित्रे काढली जातात. शहरात अस्ताव्यस्त पडलेला कचराही जलदगतीने उचण्यासाठी कडक मोहिम ठामपा आयुक्त अभिजीत बांगर राबवत आहेत. मात्र ठाण्याच्या सौंदर्याचं कोंदण असलेल्या मासुंदा तलावाजवळील आम्रपाली हॉटेलच्या कोपर्‍यापासून सेंट जॉन बापटिस्ट चर्चच्या दारापर्यंतचा परिसर अतिशय गलिच्छ झालेला आहे. सेंट जॉनच्या बाहेरील भिंतीवर वाटसरू, गर्दुल्ले ये-जा करताना लघुशंका करतात. काहीजण कचरा टाकतात. त्यामुळे या परिसरात खुप दुर्गंधी पसरत असते. या परिसर स्वच्छ करण्यासाठी ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते व रिद्धीसिद्धी मेडिकलचे मालक जितेंद्र जैन यांनी माजी नगरसेविका प्रतिभा मढवी यांच्याकडे मागणी केली. त्यांनी ताबडतोब ठामपाच्या घनकचरा विभागाला कळवून हा परिसर स्वच्छ करून घेतला. मात्र त्यानंतरही येथे लघुशंका करणार्‍या लोकांवर अंकूश बसविला जात नसल्याने शाळेत येणार्‍या पालकांना व विद्यार्थ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो. सध्या ठाणे-मुंबईत गोवरसह सर्दी-खोकला, ताप आणि इतर आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे पालक आपल्या मुलांची विशेष काळजी घेत आहेत. मात्र या घाणीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी सदर भिंतीलगत आकर्षक रंगरंगोटी करून छोटे छोटे रोप लावून गार्डनिंग केल्यास हा परिसर स्वच्छ आणि सुंदर होवू शकतो, अशी अपेक्षा जितेंद्र जैन यांनी व्यक्त केली आहे.

 35,895 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.