सुनील स्पोर्ट्स, विकास, गणेश, दादोजी कोंडदेव, यश मंडळ दुसऱ्या फेरीत

.

   मुंबई शहर कुमार, कुमारी गट निवड चाचणी कबड्डी स्पर्धा – २०२२-२३

   मुंबई : सुनील स्पोर्ट्स, विकास मंडळ, गणेश स्पोर्ट्स, दादोजी कोंडदेव, यश मंडळ यांनी मुंबई शहर कबड्डी संघटना आयोजित कुमार गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. वडाळा-मुंबई येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या भव्य पटांगणावर सुरू असलेल्या सामन्यात सुनील स्पोर्ट्सने शिवमावळे संघाचे कडवे आव्हान ३६-३२ असे मोडून काढले. मध्यांतराला  १७-१८ अशा पिछाडीवर पडलेल्या सुनीलने उत्तरार्धात आपला खेळ गतिमान करीत ही किमया साधली. सिद्धेश, प्रतीक लाड यांना सुनीलच्या विजयाचे श्रेय जाते. राकेश पिंगळे, निशांत गावडे यांनी शिवमावळे संघाकडून कडवी लढत दिली.
विकास मंडळाने साहिल गायकवाड, नयन शेलार यांच्या चतुरस्त्र खेळाच्या बळावर लायन्स स्पोर्ट्सचा प्रतिकार ३९-२८ असा मोडून काढला. आदेश दळवी, समर्थ रेडकर लायन्सकडून उत्कृष्ट खेळले. मध्यांतराला १९-१२ अशी विकासकडे आघाडी होती. गणेश स्पोर्ट्सने सातआसरा स्पोर्ट्सचा ४९-१७ असा पाडाव केला. वैभव दळवी, साहिल यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. सातआसरा संघाचा विनीत काफडे चमकला. शुभम देसाई, प्रशांत पाटील यांच्या धारदार चढाया त्यांना साहिल लाटकरची मिळालेली पकडीची साथ यामुळे दादोजी कोंडदेवने श्री साई क्लब(ब)चा ४९-२१ असा पाडाव केला. साईचा संकेत करपे बरा खेळला. यश क्रीडा मंडळाने डॉ. आंबेडकर संघाला ३३-२६ असे नमवित आगेकूच केली. ओमकार वाडकर, अलकेश निचोरे यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. डॉ. आंबेडकरकडून श्याम हेलगावकर, रोशन पवार यांचा प्रतिकार कमी पडला.

 176 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.