भारतामध्ये ६० टक्के नागरिकांना हेलिकोबॅक्टर पायलोरी जिवाणूंचा संसर्ग

अमेरिकेतील कॅनबेरी फळ भारतातील हेलिकोबॅक्टर पायलोरी  जिवाणूंच्या संसर्गास प्रतिबंध करणार

मुंबई : हेलिकोबॅक्टर पायलोरी विषाणू संसर्ग  रोखण्यासाठी क्रॅनबेरी ज्यूस च्या फायद्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच आंतड्याचे आरोग्य मजबूत करण्याच्या उद्देशाने, यूएस क्रॅनबेरी मार्केटिंग कमिटीच्या भारतातील कार्यालयाने अग्रगण्य आतडे तज्ञ, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट यांच्यासमवेत  संवादात्मक सत्रांची मालिका नुकतीच  मुंबईत आयोजित केली होती.  फोर्टिस हॉस्पिटल्सचे जेष्ठ सल्लागार जनरल अँड लॅप्रोस्कोपिक सल्लागार डॉ. जिग्नेश गांधी,  डॉ. एमी बी. हॉवेल, पीएच.डी. असोसिएट रिसर्च सायंटिस्ट मारुची सेंटर फॉर ब्लूबेरी क्रॅनबेरी रिसर्च रटगर्स विद्यापीठ व  यूएस क्रॅनबेरी मार्केटिंग समितीचे भारताचे  प्रतिनिधी यांनी संबोधित केली होती..एच. पायलोरी जिवाणूंचा संसर्ग भारतासाठी एक धोकादायक धोका असून भविष्यात  आरोग्य अर्थव्यवस्था ढासळू शकते. याविषयी अधिक माहिती देताना डॉ. जिग्नेश गांधी  म्हणाले, “हेलिकोबॅक्टर पायलोरी संसर्ग हा ग्राम-नकारात्मक बॅक्टेरियामुळे होणारा संसर्ग आहे. या बॅक्टेरियामुळे पोटात दीर्घकाळ जळजळ किंवा संसर्ग होण्याची समस्या उद्भवते. हे बॅक्टेरिया शरीरात गेल्यानंतर पचनसंस्थेत संसर्ग पसरवतात. काही लोकांमध्ये सुरुवातीला एच. पायलोरी संसर्गाची लक्षणे दिसत नाहीत. हा जीवाणू वर्षानुवर्षे शरीरात राहिल्यास पोटाचा कर्करोग होऊ शकतो. हा जीवाणू पोटाच्या अस्तराच्या संरक्षणात्मक थराला बाधा आणून आतड्यांतील डिस्बायोसिसला कारणीभूत ठरतो आपल्या भारतीय लोकसंख्येपैकी सुमारे ६० % लोक एच. पायलोरी बॅक्टेरियाने प्रभावित आहेत ज्यापैकी सुमारे ३ % लोकांना सक्रिय अल्सर रोग असू शकतो आणि त्यापैकी काही रुग्णांची  शस्त्रक्रिया करताना  गुंतागुंत होऊ शकतात तर काही रुग्णांना  लोकांना पोटाचा कर्करोग होण्याचा आयुष्यभर धोका असतो.”
क्रॅनबेरीमधील प्रोअँथोसायनिडिन्स म्हणजेच  “पीएसी” संयुगे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत आणि त्यामुळेच एच. पायलोरी बॅक्टेरियाच्या संसर्गाला दडपण्यात ते प्रभावी ठरते. अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की या फळातील अँटी-आसंजन गुणधर्म या जीवाणूंना आतड्यात चिकटून राहण्यापासून प्रतिबंधित करते आणि त्यामुळे पहिल्या टप्प्यावर संसर्ग टाळतो. क्रॅनबेरी चा रस जीवाणूंना मारत नसल्यामुळे नैसर्गिक आतड्याचे सूक्ष्मजंतू जतन केले जातात. या संक्रमणांचे व्यवस्थापन करण्यासाठी भारताने या प्रकारचा आहाराचा दृष्टिकोन स्वीकारण्याचे हे एक चांगले कारण आहे अशी माहिती डॉ. एमी बी. हॉवेल यांनी सांगितले.

 41,812 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.