करण ठाकुरला ४०वा आनंद श्री किताब

ठाणे जिल्हास्तरीय स्पर्धेत ५०पेक्षा जास्त स्पर्धकांना मागे टाकत करणने हे यश संपादन केले. स्पर्धेत स्पृहणीय कामगिरी करत ऍब्ज जिमने १७ गुणांसह सांघिक विजेतेपद मिळवले.

ठाणे : आनंद भारती समाजाने १२१ व्या आनंद भारती महाराजांच्या पुण्यतिथी-चंपाषष्ठी उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या ठाणे जिल्हा शरिरसौष्ठव स्पर्धेत मिडीयम गटातील ऍब्ज जिमचा करण ठाकुर ४० व्या आनंद श्री किताबाचा मानकरी ठरला. ठाणे जिल्हास्तरीय स्पर्धेत ५०पेक्षा जास्त स्पर्धकांना मागे टाकत करणने हे यश संपादन केले. स्पर्धेत स्पृहणीय कामगिरी करत ऍब्ज जिमने १७ गुणांसह सांघिक विजेतेपद मिळवले. स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या आर फिटनेस सेंटरने १३ गुण मिळवत उपविजेतेपद मिळवले.ऍब्ज जिमचा विवेक सिंग स्पर्धेतील सर्वोत्तम शरीरसौष्ठव प्रदर्शक ठरला.
स्पर्धेतील गटनिहाय निकाल :
शॉर्ट गट : गोरख भांडकोळी ( मसल फ्युजन जिम, वासींद), राम लाड ( शाहू जिम, भिवंडी), विशाल देसाई ( समर्थ व्यायामशाळा, डोंबिवली).
मिडीयम गट : करण ठाकुर (ऍब्ज जिम, ठाणे), निलेश दवणे (युनिव्हर्सल फिजिक सेंटर, भिवंडी), रमेश तेमर(आर फिटनेस सेंटर).
टॉल गट : जगन्नाथ जाधव (बळीराम मोकाशी व्यायामशाळा, विटावा), राजीव कार्डोझ (मॉंस्टर फॅक्टरी जिम,ठाणे).
सुपर टॉल : नंदलाल झा ( ऍब्ज जिम, ठाणे),भुषण पाटील(आर फिटनेस सेंटर, ठाणे), अभिषेक लोंढे ( अपोलो जिम, कळवा)

 7,547 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.