ठाणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांनी केले धरणे आंदोलन

.             

               

       

कोणतीही अपेक्षा नसलेल्या कंत्राटी कामगारांचा  मागच्या नोव्हेंबर पासून पगार थकवित ३० एप्रिलपासून दिला आहे ब्रेक .

ठाणे : ठाणे महापालिकेतील फायलेरिया विभागात २०१६ पासून कंत्राटी पद्धतीवर काम करणा-या कामगारांनी आज खारटन रोड येथील फायलेरिया विभागाच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले.
या आंदोलनात ठाणे जिल्हा इंटक काॅग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे व संगम डोंगरे तसेच प्रभाग काॅग्रेस अध्यक्ष प्रविण खैरालिया यांनी सहभाग घेऊन आपला पाठींबा जाहीर केला.या प्रसंगी बोलताना या कामगारांचे नेतृत्व करणारे कर्मचारी मुकेश लाहोट यांनी सागितले की,आम्ही २०१६ पासून ठाणे महापालिकेतील फायलेरिया विभागात कंत्राटी पद्धतीवर काम करित असून आम्ही कोरोना सारख्या महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करता कोणत्याही साधन सुविधा नसतानाही आम्ही दिवस रात्र सेवा दिली.आमचे काही सहकाऱ्यानाही कोरोना सारख्या आजाराला सामोरे जावे लागले होते, कोकणातील आपत्ती मध्येही महानगरपालिकेच्या वतीने आम्ही कोकणवासीयाना मदत करण्याचे काम केले असून आम्ही कोणतीही अपेक्षा ठेवली नव्ह्ती परंतु मागच्या नोव्हेंबर पासून आमचा पगार थकवित ३० एप्रिल पासून ब्रेक दिला आहे कोरोना कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीवर कामावर घेतलेल्या कर्मचा-याना आता फायलेरिया विभागात कोणताही अनुभव नसताना कामावर घेतले परंतु आम्हाला एप्रिल पासून ते आजतागायत बोलविण्यात येत नाहीये याबाबत आम्ही मुख्यमंत्री,माजी महापौर,आयुक्त यांनाही वारवार निवेदन देत असतानाही आमचा विचार होत नसल्याचे सांगितले.
          या प्रसंगी बोलताना सागितले की,राज्यातील सत्ताबदल झाल्यावर ठाण्यातील मुख्यमंत्री होतो ही निश्चितच ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी असताना मात्र याच ठाण्यातील कंत्राटी कामगारांवर अशा प्रकारची वागणूक मिळत असेल तर या कामगारांनी न्याय तरी कुठे मागायचा?असा सवाल करित मुख्यमंत्री यांनी याबाबत त्वरित दखल घेऊन या कामगारांवरील अन्याय दूर करावा अशी मागणी केली.या प्रसंगी मोठ्या प्रमाणात फायलेरिया विभागात कंत्राटी पद्धतीवर काम केले कामगार उपस्थित होते.

 4,656 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.