ठाण्यात ‘बिजनेस जत्रा २०२२’ या व्यावसायिक मेळाव्याचे आयोजन

११ व १२ नोव्हेंबर दरम्यान सकाळी १०.३० वाजता ते संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत सुरु राहणाऱ्या या जत्रेमध्ये १२५ पेक्षा अधिक स्टॉल्स असणार आहेत.

ठाणे : लक्ष्यवेध आणि ठाणेकर कॅम्पेन पार्टनर ॲडमार्क मल्टीवेंचरच्या संयुक्त विद्यमाने ‘ बिजनेस जत्रा ‘ या व्यावसायिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा ११ व १२ नोव्हेंबर रोजी टीप टॉप प्लाझा, ठाणे(प) येथे होईल.
या मेळाव्यासाठी इ -जॉय बाईक
मुख्य पुरस्कर्ते, तर पितांबरी,
सारस्वत बँक, क्विक शेफ, स्नॅक बडी,धन्वंतरी केरला आदी सह पुरस्कर्ते आहेत.
यंदा मेळाव्याचे यंदाचे २ रे वर्ष असून दहा हजारहून अधिक विविध क्षेत्रातील व्यवसायिक दोन दिवसात भेट देणार आहेत.या मेळाव्यादरम्यान लघुउद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी नामवंत आणि यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन देखील आयोजित करण्यात आले आहे.तसेच प्रदर्शन पण असणार आहे.
११ व १२ नोव्हेंबर दरम्यान सकाळी १०.३० वाजता ते संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत सुरु राहणाऱ्या या जत्रेमध्ये १२५ पेक्षा अधिक स्टॉल्स असणार आहेत. वेगवेगळ्या इंडस्ट्रिज संलग्न संस्था आणि दिग्गज व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. मुख्य अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंदीय लघु, शुक्ष्म आणि मध्यम उद्योग विकास मंत्री नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार डॉ .श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के,
आमदार प्रसाद लाड उपस्थित राहणार आहेत. ठामपा आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी
केंद्र सरकार, राज्य सरकार सर्व उद्योग मंत्रालयातील अधिकारी आणि ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी यांचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले आहे.

 33,808 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.