बंदीवानांच्या कलाकौशल्याला प्रोत्साहन द्या – जिल्हाधिकारी


ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या दीपावली सेलचे जिल्हाधिकारी आणि कारागृह उपमहासंचालकांच्या हस्ते उदघाटन

ठाणे : ठाणे कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांच्या अंगभूत कलाकौशल्याला नागरीकांनी प्रोत्साहन द्यावे.असे आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहात दीपावली सणानिमित्त सेल लागला असुन या अनोख्या कलाकुसरीच्या वस्तुंच्या सेलचे उदघाटन गुरुवारी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि कारागृह उपमहासंचालक योगेश देसाई यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी कारागृहाचे प्रभारी अधीक्षक भाईदास ढोले व तुरुंगाधिकारी उपस्थित होते.
  ठाणे कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कौशल्यवान हातानी बनविलेल्या विविध गृहपयोगी वस्तू ऐन दिवाळी सणासाठी ठाणे कारागृहात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.या सेलच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी शिनगारे यांनी, कुणीही जन्मतः गुन्हेगार नसतो.एखादी परिस्थिती अथवा अपप्रवृत्ती गुन्हेगार बनवते. ठाणे मध्यवर्ती कारागृहात अनेक बंदिवान शिक्षा भोगत आहेत. त्यांच्या अंगभूत कलागुण, कौशल्य तसेच त्यांच्या आवडीनिवडी जोपासत बंदिवानानी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी कारागृह निर्मित वस्तू विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे. या उपक्रमाला नागरीकांनी प्रोत्साहन दिल्यास भविष्यात शिक्षा संपवुन परतल्यावर एकप्रकारे त्यांच्या पुर्नवसनाला साह्य होईल.असे सांगितले.दरम्यान, कारागृह उपसंचालक योगेश देसाई यांनीही आपल्या कारकिर्दीत सुरु झालेल्या या उपक्रमाची स्तुती केली.
कारागृह दिवाळी सेलमध्ये काय मिळेल ?
ठाणे कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांद्वारे अनेक गृहपोयोगी वस्तूंच्या निर्मितीचा उदयोग गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे.यात शोपीस वस्तू,कपडे,बेकरी उत्पादन,फर्निचर वस्तू,गृहोपयोगी व शोभेच्या वस्तू आहेत.तसेच,दिवाळी सणासाठी खाद्यपदार्थ,गृहपयोगी वस्तू, लाकडी खुर्च्या,चौरंग,देव्हारा आदी विविध प्रकारच्या खुर्च्या स्टँड,टॉवेल,शर्ट,लेडीज पर्स अशा विविध वस्तूचा समावेश आहे.या वस्तूंची विक्री व्हावी यासाठी ठाणे कारागृह प्रशासनाने हे वस्तू प्रदर्शन ठेवले आहे.कोर्ट नाक्यानजीक असलेल्या प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयासमोरील ठाणे कारागृहात दिवाळी संपेपर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी उपलब्ध आहे.

 4,037 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.